पुणे महापालिकेने ( Pune Municipal Corporation) समान पाणी योजना राबविण्यास सुरुवात केली असून, अधिक प्रमाणात पाणी वापरणाऱ्या सोसायट्यांचे नळ कनेक्शन तोडले जाणार आहे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शहरात 141 झोन तयार करण्यात आले असून, 47 झोन पूर्ण झाले आहेत. त्यातील 41 झोनमध्ये मीटरद्वारे पाण्याच्या वापरावर नियंत्रण ठेवले जात आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी दररोज 135 लिटर पाणी वापरण्याचा नियम आहे, मात्र काही सोसायट्यांमध्ये हा वापर 500 ते 600 लिटरपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे.
महापालिकेच्या अहवालानुसार, काही सोसायट्यांमध्ये ( Pune Municipal Corporation) मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नियम मोडणाऱ्या सोसायट्यांचे नळ कनेक्शन तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
देवेंद्र फडणवीस आणि बिल गेट्स यांची मुंबईत बैठक; ‘या’ विषयांवर झाली चर्चा