धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या निवासस्थानी करु शकता – शरद पवार

मुंबई – राज्यातील जनता सध्या अनेक संकटाचा (crisis) सामना करत असताना सत्ताधारी आणि विरोधक मात्र नको त्या विषयात आपला बहुमुल्य वेळ वाया घालवताना दिसत आहेत. राज्यात अनेक भागात पाण्याची टंचाई ( Water scarcity ) आहे. विजेची समस्या ( Electricity problem ) आहे, इंधन दरवाढ ( Fuel price hike ) आदी समस्या असताना हनुमान चालीसा (Hanuman Chalisa ) हा नेत्यांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे असं दिसत आहे.

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा ( (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) ) यांनी मातोश्री (Matoshree) समोर हनुमान चालीसा  वाचनाचा धरलेला आग्रह आणि त्यानंतर त्यांना झालेली अटक हा मुद्दा चर्चेत असताना आता राष्ट्रवादीच्या एका महिला नेत्याने थेट मोदींच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa outside Modi’s residence ) म्हणण्यासाठी परवानगी मागितली आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत भाष्य केले आहे. धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या निवासस्थानी करु शकता. पण तो कार्यक्रम माझ्या दारात करतो म्हटल्यावर त्याबद्दलची अस्वस्थता माझ्याबद्दल आस्था असलेल्या सहकाऱ्यांमध्ये निर्माण झाली तर त्यांना दोष देता येणार नाही. येत्या काही दिवसात हे वातावरण शमेल अशी अपेक्षा आहे,” असं पवार यांनी म्हटलं.