शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकहिताचे कार्यक्रम राबवा; भुजबळ यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकहिताचे कार्यक्रम राबवा; भुजबळ यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश

नाशिक – आगामी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी करूनच लढविल्या जातील कोणत्याही निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जवळ करणार नाही असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागून जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावे असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आघाडी करून निवडणूक लढविण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात येणार असले तरी देखील महाविकास आघाडीच्या वतीनेच निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे देखील भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व नगरपंचायत निवडणूकांच्या पूर्व तयारीसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन नाशिक येथे पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकहिताचे कार्यक्रम राबवावेत असे आवाहन देखील राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी बोलतांना केले.

आगामी निवडणुकीत आपण सर्व ताकदीने निवडणुकीत उतरणार आहोत. पवार साहेबांच्या विचारानुसार महिला आणि युवकांना जास्तीत जास्त संधी देण्यात येईल. निवडणुकीची सुरुवात ही मतदार पडताळणी पासून सुरु होत असते. कारण बोगस मतदान करण्यासाठी काही पक्षांकडून मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट केले जातात याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. मतदार यादीत किती खरे आणि किती खोटे मतदार आहेत याची पडताळणी करून मतदार नोंदणी करण्यात यावी. त्यासाठी आवश्यक असल्यास तक्रारी दाखल करण्यात याव्यात असे आवाहनही यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी केले. ते पुढे म्हणाले की, ग्राम पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यात येऊन आगामी ग्रामपंचायत, सोसायटी, बाजार समित्या, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून पक्षाची ताकद वाढवावी. निवडणुकीला सामोरे जात असतांना आपापसातील मतभेद बाजूला ठेवावेत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

खा.शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दि. ७ डिसेंबर पासून सर्व तालुक्यात कार्यकर्ता मेळावे घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी यावेळी बोलतांना सांगितले. तसेच दि. १२ डिसेंबर या वाढदिवसाच्या दिवशी तालुकावार व्हर्चुअल रॅली काढण्यात येणार आहे. तर दि. १४ डिसेंबर पासून तालुकावार विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे देखील जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी बोलतांना सांगितले.

Previous Post
सकारात्मक ऊर्जेचा झरा : डॉ. बबन जोगदंड

सकारात्मक ऊर्जेचा झरा : डॉ. बबन जोगदंड

Next Post
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून 27 हजार सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम घोषित

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून 27 हजार सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम घोषित

Related Posts
आम्हीच त्याला शोधून काढले! हार्दिकच्या घरवापसीनंतर नीता अंबानींचा आयपीएल फ्रँचायझींना टोला

आम्हीच त्याला शोधून काढले! हार्दिकच्या घरवापसीनंतर नीता अंबानींचा आयपीएल फ्रँचायझींना टोला

Hardik Pandya Comeback In Mumbai Indians:  गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने अधिकृतपणे संघ सोडला आहे. आगामी आयपीएल हंगामासाठी…
Read More
Nana Patole | कॉँग्रेस नेहमीच जनतेला पायाची धूळ समजत आली आहे; नाना पटोलेंच्या कृतीवर भाजपाची सडकून टीका

Nana Patole | कॉँग्रेस नेहमीच जनतेला पायाची धूळ समजत आली आहे; नाना पटोलेंच्या कृतीवर भाजपाची सडकून टीका

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कार्यकर्त्यांनी पाय धुतल्याचा प्रकार अकोल्यात घडला आहे. यामुळे नवा वाद निर्माण…
Read More
छगन भुजबळ

महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न; मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार नाही – छगन भुजबळ

नाशिक :- महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार नाही. दिल्लीला देखील आधार देण्याचं…
Read More