इम्रान खान यांना अटक होण्याच्या शक्यतेमुळं समर्थक पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर उतरले

Imran Khan –  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होण्याच्या शक्यतेमुळं त्यांचे समर्थक पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर उतरले असल्यानं तिथं अशांतता निर्माण झाली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांच्या आवाहनावरून पाकिस्तानच्या प्रमुख शहरांमध्ये त्यांच्या समर्थकांनी निदर्शनं सुरू केली असून लाहोरमधील त्यांच्या जमान पार्क या निवासस्थानाबाहेर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा पोलिसांशी संघर्ष सुरूच आहे.

इस्लामाबाद, पेशावर, लाहोर आणि कराची या शहरांमध्ये ही आंदोलनं करण्यात येत आहेत. काही झालं तरी न्यायालयाच्या निर्देशांनुसार पोलिस अधिकारी इम्रान खान यांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करणार असल्यावर पाकिस्तानच्या अंतर्गत घडामोडींचे मंत्री अजूनही ठाम आहेत.