आझाद मराठीच्या बातमीचा परिणाम; चोवीस तासांत वनविभागाकडुन वन्यजीवांसाठी झाली पाण्याची सोय

शंभूराजे फरतडे/ करमाळा – पाण्यासाठी वन्यजीवांची भटकंती, करमाळा वनविभागाचे दुर्लक्ष! या मथळ्याखाली काल आझाद मराठी न्युज पोर्टल वर वृत्त प्रसारित झाल्यानंतर वनविभाग(Forest Department)  खडबडून जागे झाले असून चोवीस तासांच्या आत करमाळा(Karmala)  येथील वनविभागाने वन्यजीवांसाठी असलेल्या कृत्रिम पाणवठ्यात (Artificial ponds) पाणी सोडले असून पशुपक्षांची पाण्यासाठी वणवण थांबली आहे.

यातील हकिकत अशी की करमाळा शहराच्या सभोवताली असलेल्या अभयारण्यात पशुपक्षांसाठी लाखो रुपयांपर्यंत खर्च करून कृत्रिम पाणवठे तयार केले होते मात्र या मध्ये पाणी सोडण्यास कुचराई केली जात होती. वन्यजीवनांची पाण्यासाठी होणारी परवड लक्षात घेऊन करमाळा येथील स्व बाबुराव गायकवाड प्रतिष्ठान च्या(Baburao Gaikwad Pratishthan)  कार्यकर्त्यांकडून स्वखर्चाने टँकर लावून पाण्याची सोय केली जात होती. मात्र वनविभाग अधिकाऱ्यांकडून या कार्यकर्त्यांना पाणी सोडण्यास मज्जाव करण्यात आला होता.

विशेष म्हणजे स्वतः वनविभागाने देखील पाणी सोडले नसल्याने पाणवठे कोरडे ठाक पडले होते. वनविभागाचा हा गलथान कारभार आझाद मराठीने चव्हाट्यावर आणल्यानंतर हा प्रश्न निकाली लागला असून वनविभागाकडुन पाणवठ्यात पाणी सोडले गेले आहे. मुक्या प्राण्यांची समस्या सोडवल्या बद्दल आझाद मराठी चे वन्यजीव प्रेमीनी आभार मानले आहेत.