एसटीचे विलीनीकरण झाल्यास राज्यकर्त्यांच्या दुकानदारी बंद होतील – पांडुरंग शिंदे

मुखेड – एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाल्यास महामंडळावर ज्यांच्या दुकानदाऱ्या चालू आहेत, त्या राज्यकर्त्यांच्या दुकानदारी बंद होतील म्हणून विलीनीकरणाला विरोध होत आहे अशी घणाघाती टीका रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी मुखेड आगाराच्या वतीने आयोजित आक्रोश मोर्चाला संबोधित करताना केली

एसटी महामंडळामध्ये टायरचा रिबूट करून नवीन बिल काढणे, जुनी बस नवीन दाखवून बिल काढणे, डिझेल अर्ध मंत्र्याच्या घरी नेणे, मराठी भाषा दिनावर शेकडो रुपये खर्च करणे, वायफाय वर खर्च करणे, शहरातील मोक्याच्या जागेवर डोळा असल्यामुळे विलीनीकरणास विरोध करत आहेत, अश्या प्रकारे एसटी महामंडळामध्ये भ्रष्टाचाराची पोल-खोल शिंदे यांनी आपल्या भाषणात केली.

लढा विलीनीकरणाचा… एसटी कामगार व कर्मचारी मुखेड आगार आक्रोश मोर्चा बस स्थानक ते तहसील कार्यालय,मुखेड मोठ्या उत्साहात  झाला आणि तहसिल कार्यालय समोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

आ. तुषार राठोड, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील ,शेतकरी नेते बालाजी पाटील सांगवीकर, रयत क्रांती संघटना युवा जिल्हाध्यक्ष बालाजी ढोसने,  मेजर डुमने सर, सचिन पाटील इंगोले (राजमुद्रा ग्रुप अध्यक्ष), संतोषदादा बनसोडे (मनसे ता. अध्यक्ष)अनिल शिरसे (रिपाई), शांताबाई येवतीकर, प्रा. गायकवाड सर, अशोक गजलवाड व मुखेड आगारातील गजानन गोरडवार , नागोराव शेटवाड, परमेश्वर क्षीरसागर, अनतेश्वर गायकवाड, संभाजी कोलमवाड, सत्यवान शिंदे, सूर्यकांत पवळे, गोणारकर, पवित्रे, विठाबाई पांचाळ यासह सर्व मुखेड आगारातील कर्मचारी व तालुक्यातील ग्रामपंचायत लोक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रांचाल सूर्यकांत पवळे यांनी केले,आभार धनंजय जाधव यांनी मांडले.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करा – अजित पवार

Next Post
खोत-पडळकर यांनी आंदोलनातून माघार का घेतली? नवाब मलिकांनी सांगितले नेमके कारण

खोत-पडळकर यांनी आंदोलनातून माघार का घेतली? नवाब मलिकांनी सांगितले नेमके कारण

Related Posts
Ram Mandir Garbhagriha | राम मंदिराच्या गर्भगृहातील अप्रतिम दृश्य, गरुडदेवाने रामलल्लाला घातली प्रदक्षिणा, पाहा व्हिडिओ

Ram Mandir Garbhagriha | राम मंदिराच्या गर्भगृहातील अप्रतिम दृश्य, गरुडदेवाने रामलल्लाला घातली प्रदक्षिणा, पाहा व्हिडिओ

Ram Mandir Garbhagriha : राम मंदिराचा अभिषेक होऊन दीड महिनाही उलटला नाही आणि लाखो भाविकांनी येथे दर्शन घेतले…
Read More
सेलिब्रिटींवर गँगस्टरची दहशत, सलमान खाननंतर प्रसिद्ध गायकाच्या घरावर गोळीबार

सेलिब्रिटींवर गँगस्टरची दहशत, सलमान खाननंतर प्रसिद्ध गायकाच्या घरावर गोळीबार

सोमवारी कॅनडामध्ये पंजाबी गायक प्रेम ढिल्लन (singer Prem Dhillon) यांच्या घरावर काही लोकांनी गोळीबार केला. माहितीनुसार, या हल्ल्यात…
Read More
'तुझाही दाभोळकर करु': राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

‘तुझाही दाभोळकर करु’: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई – राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना…
Read More