केजरीवालांनी करून दाखवलं; दिल्लीत पेट्रोल मिळणार 8 रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : दिल्लीत पेट्रोल स्वस्त झाले आहे. बुधवारी जनतेला दिलासा देत केजरीवाल सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये कपात केल्याने येथे पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीत केजरीवाल सरकार पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याबाबत निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा होती.

केजरीवाल सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 30 टक्क्यांवरून 19.40 टक्क्यांवर आणला आहे, त्यामुळे राजधानीतील पेट्रोल पंपांवर पेट्रोल आठ रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील.

या कपातीनंतर दिल्लीत पेट्रोल 96 रुपये प्रति लिटर दराने विकले जाऊ शकते. आतापर्यंत त्याची किंमत 103.97 रुपये आहे. डिझेलबद्दल बोलायचे झाले तर, येथे डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे.

दिल्लीतील या कपातीनंतर राजधानी दिल्ली हे देशातील एकमेव शहर बनले आहे जिथे पेट्रोल 100 रुपयांच्या आत विकले जाईल. अन्यथा, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर जात आहेत. त्याचवेळी, गेल्या २७ दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

गेल्या महिन्यात म्हणजे दिवाळीपूर्वी म्हणजे 3 नोव्हेंबरला केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 5 आणि 10 रुपये प्रति लिटरने कमी केले होते. सरकारने राज्यांना व्हॅट कमी करण्यास सांगितले होते, जेणेकरून सर्वसामान्यांना अधिक दिलासा मिळू शकेल. यानंतर अनेक राज्यांनी तेलावरील व्हॅट कमी केला होता.

हे देखील पहा