वृध्दापकाळात वयोवृध्दांना कृत्रिम अंग साहित्यामुळे मिळणार आधार – रामदास तडस

वर्धा :- वयोवृध्दांना वाढत्या वयोमानानुसार कमी ऐकू येणे, चालण्याचा त्रास, दात पडणे यासारख्या येणा-या अडचणीवर वयोवृध्दांना देण्यात येणा-या कृत्रिम अंग साहित्यामुळे वृध्दापकाळात मोठा आधार मिळणार असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी आज कृत्रिम अंग साहित्य वाटप कार्यक्रमात केले.

सामाजिक न्याय भवन येथे केंद्र शासनाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण कंपनीच्या (अलीम्को) वतीने जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने केंद्र शासनाच्या वयोश्री योजने अंतर्गत वयोवध्दांना कृत्रिम अंग साहित्याचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पंचायत समिती सभापती महेश आगे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, उपायुक्त जातपडताळणी शरद चव्हाण आदी उपस्थित होते.

वयोवृध्दांना वयोमानानुसार कमी ऐकू येणे, दात पडणे, चालण्यास त्रास होणे अशा वृध्दापकाळात येणा-या अडचणीवर मात करण्यासाठी वयोवृध्दांना कृत्रिम अंग साहित्या मोठा आधार मिळेल यासाठी केंद्र शासनाने वयोश्री योजना सुरु केली आहे. योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या अधिकृत कंपनी मार्फत व्हिल चेअर, काटया, कर्णयंत्र, वॉकर, आदी साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. योजनेचा वयोवृध्दानी लाभ घेण्याचे आवाहन तडस यांनी यावेळी केले.

यासाठी केंद्र शासनाने बजेट मध्ये विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच दिव्यांगांसाठी सुध्दा कृत्रिम अंग साहित्याचे वाटप करण्यात येत असून दिव्यांगांनी सुध्दा कृत्रिम अंग साहित्याचा लाभ घ्यावा. यासाठी लाभार्थ्यांनी नोंदणी करावी असेही तडस म्हणाले.

वयोवध्दांना कृत्रिम अंग साहित्यांमुळे दुस-यावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. व वृध्दापकाळात या साहित्याचा मोठा आधार मिळणार असल्याचे श्रीमती सरिता गाखरे यांनी यावेळी सांगितले. तर वृध्दाना त्यांच्या कुंटूबाकडून काही त्रास होत असल्यास किंवा समस्या असल्यास प्रशासनाकडून सोडविण्यात येईल यासाठी त्यांनी तहसिल कार्यालया मार्फत अर्ज सादर करावा. तसेच आरोग्य बाबत समस्या असल्यास शासकीय रुग्णालयात वयोवृध्दांसाठी विशेष सुविधा पुरविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांचे हस्ते व्हिल चेअर, वॉकर, काठया, कृत्रिम दात व कर्ण यंत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला जात पडताळणी विभागाचे संशोधन अधिकारी गौतम वाकोडे, समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राद्यापक, कर्मचारी वयोवृध्द लाभार्थी उपस्थित होते.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

महिलांच्या कर्तत्वाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील – अब्दुल सत्तार

Next Post

प्रत्येक संकटावर मात करुन महाराष्ट्र निर्धाराने अन् एकजुटीने पुढे जात राहणार – पवार

Related Posts
... म्हणून महाराष्ट्र शासनानं कोबाड गांधी यांच्या 'फ्रॅक्चर्ड फ्रिडम' पुस्तकाला दिलेला पुरस्कार रद्द केला

… म्हणून महाराष्ट्र शासनानं कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम’ पुस्तकाला दिलेला पुरस्कार रद्द केला

मुंबई – कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी…
Read More
अजित पवारांच्या निकटवर्तीयाला मुजोरी भोवली, बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अजित पवारांच्या निकटवर्तीयाला मुजोरी भोवली, बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे (Baburao Chandere) यांच्यावर एका नागरिकाला…
Read More
Amol Kolhe | शिरुरमध्ये अमोल कोल्हेंच्या विरोधात बॅनर, सुज्ञ मतदारांनी विचारले थेट प्रश्न

Amol Kolhe | शिरुरमध्ये अमोल कोल्हेंच्या विरोधात बॅनर, सुज्ञ मतदारांनी विचारले थेट प्रश्न

Amol Kolhe: लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) निमित्ताने शिरूर लोकसभा (Shirur Loksabha) मतदारसंघात वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.…
Read More