राज्य सॉफ्टबॉल स्पर्धेत मुलींच्या पुणे जिल्हा संघाला विजेतेपद

वरिष्ठ गट राज्य सॉफ्टबॉल स्पर्धा : मुलांच्या गटात उपविजेतेपद

पुणे : औरंगाबाद (संभाजीनगर) येथे घेण्यात आलेल्या २८ व्या वरिष्ठगट राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत मुलींच्या गटातून पुणे जिल्हा संघाने विजेतेपदाला गवसणी घातली तर मुलांच्या विभागातून पुणे जिल्हा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.(In the 8th senior group state level softball tournament, the Pune district team won the title in the girls category.)

महिला विभागाच्या अंतिम लढतीमध्ये पुणे जिल्हा संघाने जळगाव संघाला २-१ अशा होमरनने पराभूत करताना विजेतेपद पटकावले. या लढतीत किरण नवगिरे व फरहाना शेख (Kiran Navgire and Farhana Shaikh) यांनी प्रत्येकी एक होमरन केला. तर दीक्षा पिल्लेने पिचिंग केल्याने जळगाव संघाला केवळ एकच होमरन करता आला.

तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये पुणे जिल्हा संघाने पुणे शहर संघाला १३-६ असे एकतर्फी पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मुलांच्या गटात जळगाव संघाने पुणे जिल्हा संघाला ७-१ अशा फरकाने पराभूत करताना विजेतेपद पटकावले होते. तत्पूर्वी उपांत्य फेरीत पुणे जिल्हा संघाने अमरावती संघाला ८-२ असे पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेतून जगन्नाथपुरी (Jagannathpuri)  येथे होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुलांच्या गटातून ३ तर मुलींच्या गटातून ४ खेळाडूंची राज्य संघात निवड करण्यात आली आहे. यामध्ये आझम स्पोर्ट्स अकादमीच्या ऐश्वर्या बोडके, मोनाली नातू, फिजा सय्यद, किरण नवगिरे, स्वप्नील गदादे, ऋत्विक फाटे व प्रणव पाटील (Aishwarya Bodke, Monali Natu, Fiza Syed, Kiran Navgire, Swapnil Gadade, Ritwik Phate and Pranav Patil) यांचा समावेश करण्यात आला आहे.

विजेत्या खेळाडू, प्रशिक्षक डॉ. गुलजार शेख यांचे अभिनंदन एमसीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार यांनी करताना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.