मागील दोन वर्षात महाविकास काय असतो हे आपल्या राज्याने याची देही याची डोळा पाहिले आहे – यादव

पुणे – भाजपला राज्यात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण होत असून सरकारच्या कामगिरीबाबत महाविकास आघाडीतील नेते समाधान व्यक्त करत आहेत तर विरोधीपाक्षातील नेत्यांनी ठाकरे सरकारची पोलखोल सुरु केली आहे.

वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिला सुरक्षा आदी मुद्द्यांवर म्हणावी तेवढी चांगली कामगिरी सरकारला करता आली नसल्याची टीका विरोधक करत आहेत. तर कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात केलेल्या कामगिरीचा दाखला देत महाविकास आघाडीतील नेते स्वतःच्या सरकारचा बचाव करताना दिसून येत आहेत.

दरम्यान, युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी महाविकास आघाडीच्या वाटचालीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. मागील दोन वर्षात खऱ्या आर्थने महाविकास काय असतो हे आपल्या राज्याने याची देही याची डोळा पाहिले आहे.  कोव्हिड काळात . मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचा संयम आणि उत्तम नियोजन आणिउपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी निभावलेली राज्याप्रतीची जबाबदारी पाहून राज्यातील प्रत्येक सामान्य माणसाला हे आपलं सरकार वाटतं.

इथून पुढील वाटचाल देखील तितकीच जोमाने आणि विकास अधिक वेगाने होईल या शंका नाहीच. पण द्वितीय वर्षपुरती निमित्त मी खरा ‘राजा’ असणाऱ्या सामान्य जनतेचे देखील आभार मनातू त्यांच्या सहकार्य आणि प्रेमामुळेच इतक्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील आमचे सरकार डगमगले नाही. इथून पुढे ही ते कधीच डगमगणार नाही असं यादव यांनी म्हटले आहे.