Devendra Fadnavis | भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात सोमवारी ३० सप्टेंबर २०२४ रोजी ‘महाराष्ट्र विधानसभा २०२४ विजय संकल्प संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. मुंबईतील दादर मधील वसंत स्मृती येथे सकाळी १० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल.
देवेंद्र फडणवीस यांच्या उद्घाटकीय भाषणानंतर संमेलनात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री भूपेंद्. यादव, किरण रिजुजू, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, व्ही. सतीश जी हे मार्गदर्शन करतील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम व मोर्चा प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे यांनी दिली.
‘महाराष्ट्र विधानसभा २०२४ विजय संकल्प संमेलन’ मध्ये प्रदेश मोर्चा पदाधिकारी, अनू जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष, दोन महामंत्री, विधानसभा समन्वयक, सहसमन्वयक सहभागी होणार आहेत.
‘महाराष्ट्र विधानसभा २०२४ विजय संकल्प संमेलन’ मध्ये मोठ्या संख्येत राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ऍड. धर्मपाल मेश्राम व दिलीप कांबळे यांनी केले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
हरियाणामध्ये तिसऱ्यांदा भाजपचे बहुमताने सरकार येणार, रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास
वडगावशेरीत ‘आप’चा उमेदवार ठरला, प्रशांत केदारी लढवणार विधानसभा निवडणूक
विधानसभेच्या १२ जागांबाबत तडजोड नाही : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष