मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ) यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु झाला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात जेव्हा दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानावर उतरले तेव्हाच एक नवीन विक्रम झाला आहे.
भारताकडून कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली याचे पुनरागम झाल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात तो भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. तर न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसन दुखापतग्रस्त असल्याने त्याला या कसोटीला मुकावे लागले आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघाची कमान टॉम लेथमकडे सोपविण्यात आली आहे.
त्यामुळे भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेत आता दोन्ही संघांचे मिळून 4 कर्णधार झाले आहेत. हे एक रेकॉर्डच आहे. पहिल्या कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व अजिंक्य रहाणे याने केले होते तर न्यूझीलंड संघाची कमान त्यांचा नियमित कर्णधार केन विल्यमसन याच्याकडे होती. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघाचे कर्णधार बदलल्याने या मालिकेत आता 4 कर्णधार झाले आहे.
याआधी असे १८८९ला साउथ आफ्रिका आणि इंग्लंड मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत घडले होते. त्यावेळी पहिल्या सामन्यात इंग्लंडची कमान Aubrey Smith याने सांभाळली होती तर दुसऱ्या सामन्यात Monty Bowden हा कर्णधार होता. तर दुसरीकडे पहिल्या सामन्यात साउथ आफ्रिका संघाची कमान Owen Dunell याने सांभाळली होती आणि दुसऱ्या सामन्यात William Milton कडे संघाचे नेतृत्व होते. त्यामुळे १८८९च्या रेकॉर्डची बरोबरी झाली.
हे देखील पहा
https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM