अश्विन का झाला क्रिश ? वाचा काय घडलं वानखेडेवर !

मुंबई : भारत न्यूझीलंड दरम्यान सुरु असलेल्या मुंबई कसोटीच्या तिसर्‍या दिवशी चहापानाच्या वेळेआधीच असा काही प्रकार घडला की ज्याने सगळेच थक्क झाले. खरे तर असे झाले की अश्विनने न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात टॉम लॅथमला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर दुसरा नवा फलंदाज डॅरिल मिशेल फलंदाजीला आला. पण नवीन फलंदाज क्रीझवर येताच मैदानावर चक्कर मारणारा स्पायडर कॅम अचानक नॉन-स्टाईकच्या दिशेला येऊन थांबला.

स्पायडर कॅम फक्त व्हिडीओ बनवण्यासाठी तिथेच थांबला होता, असं सगळ्यांना वाटलं. मात्र स्पायडर कॅम एकाच ठिकाणी बराच वेळ थांबल्याने पंचांनाही आश्चर्याचा धक्का बसला. अशा स्थितीत पंचांनी वेळ लक्षात घेऊन चहाचा ब्रेक पटकन जाहीर केला. स्पायडर कॅमचा दोष नंतर दुरुस्त करण्यात आला. यानंतर चहापानानंतर पुन्हा सामना सुरू झाला.

दुसरीकडे, भारतीय खेळाडूंना स्पायडर कॅम त्यांच्यामध्ये सापडल्याने आश्चर्यचकित झाले आणि ते मस्ती करताना दिसले. विराट कोहलीपासून अश्विनपर्यंत सर्वांनी स्पायडर कॅम सोबत खेळण्याचा मोह आवरला नाही. बीसीसीआयनेही त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

भारताने आपला दुसरा डाव २७६ धावांवर घोषित केला आहे. भारताने न्यूझीलंडला 540 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारतातर्फे मयंक अग्रवालने शानदार ६२ धावा केल्या, पुजारा ४७ शिवाय शेवटच्या क्षणी अक्षर पटेलने धमाका करत नाबाद ४१ धावा केल्या. तर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने ५ बाद १४० धावा केल्या होत्या.