IND vs PAK | भारताविरुद्धच्या पराभवानंतर ढसाढसा रडला नसीम शाह, रोहित शर्माने केलं शांत

IND vs PAK | भारताविरुद्धच्या पराभवानंतर ढसाढसा रडला नसीम शाह, रोहित शर्माने केलं शांत

रविवारी खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक 2024 च्या कट्टर लढतीत भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी (IND vs PAK) पराभव केला. टीम इंडियाविरुद्धचा अत्यंत जवळचा सामना गमावल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाह मैदानावरच रडू लागला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहला रडताना पाहून भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्याला शांत केले. पाकिस्तानसमोर विजयासाठी 120 धावांचे सोपे लक्ष्य होते, परंतु भारतीय वेगवान गोलंदाजांनी त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी (IND vs PAK) संघाला 113 धावांवर रोखले.

https://twitter.com/Suhaibjutt1016/status/1799902757106917862

भारताकडून सामना हरल्यानंतर पाक क्रिकेटपटू ढसाढसा रडू लागला
पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या 6 चेंडूत 18 धावांची गरज होती. त्यावेळी पाकिस्तानकडून इमाद वसीम आणि नसीम शाह क्रीजवर उपस्थित होते. अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर इमाद वसीमला (15 धावा) बाद करून पाकिस्तानच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. यानंतर नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदीला पाकिस्तानला विजयापर्यंत नेण्याची संधी होती. नसीम शाहनेही शेवटच्या षटकातील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर लागोपाठ दोन चौकार मारले, पण तरीही पाकिस्तानने सामना गमावला.

https://twitter.com/vannumeena0/status/1799984160985211208

रोहित शर्माने शांत केले
अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात आपली जादू दाखवत शेवटच्या षटकात केवळ 11 धावा दिल्या. भारताविरुद्धचा सामना 6 धावांनी हरल्यानंतर नसीम शाह अचानक रडायला लागला. शाहीन शाह आफ्रिदीने नसीम शाहच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही नसीम शाहच्या खांद्यावर हात ठेवून गप्प करण्याचा प्रयत्न केला. नसीम शाह याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!

Previous Post
T20 World Cup 2024 | भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान सुपर 8 फेरीतून बाहेर? आता बाबरच्या संघापुढे एकमेव मार्ग उरलाय

T20 World Cup 2024 | भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान सुपर 8 फेरीतून बाहेर? आता बाबरच्या संघापुढे एकमेव मार्ग उरलाय

Next Post
IND VS PAK In Lahor | लाहोरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार? मोठी अपडेट आली समोर

IND VS PAK In Lahor | लाहोरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार? मोठी अपडेट आली समोर

Related Posts
sharad pawar - raj thackeray

भाजपनेच राज ठाकरेंचा गेम केला, राष्ट्रवादीवर केलेला आरोप बिनबुडाचा – तपासे

मुंबई – अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असा आरोप राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील…
Read More
सुनील शेळके

पुणे जिल्ह्यातील ‘या’ राष्ट्रवादीच्या आमदाराची मंत्रीपदी वर्णी लागणार ?

पुणे : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे लोटली असून आता खांदेपालट तसेच विस्तार …
Read More
Radhakrishna Vikhe Patil

खंदरमाळी घटनेस जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – विखे-पाटील

शिर्डी – संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथे विजेचा शॉक लागून ४ लहान मुलांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोषी व्यक्तींवर सदोष…
Read More