IND VS PAK | विजयाच्या वाटेवर असणाऱ्या पाकिस्तानने कुठे गमावला सामना? भारतासाठी हा ठरला टर्निंग पॉईन्ट

IND VS PAK | विजयाच्या वाटेवर असणाऱ्या पाकिस्तानने कुठे गमावला सामना? भारतासाठी हा ठरला टर्निंग पॉईन्ट

भारतीय क्रिकेट संघाने टी20 विश्वचषक 2024 मध्ये पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव (IND VS PAK) केला. मात्र हा विजय भारतासाठी सोपा नव्हता. एकवेळी पाकिस्तान हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते पण सामन्ादरम्यान एक टर्निंग पॉइंट आला आणि पाकिस्तान संघ जिंकूनही सामना हरला. या सामन्यात एक षटक असे होते ज्याने टीम इंडियाला सामन्यात परत आणले आणि तो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.

या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. भारतीय संघ 19 षटकांत 119 धावांत गडगडला. टी20 विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध सर्वबाद (IND VS PAK) होण्याची ही पहिलीच वेळ होती.

बुमराहने सामन्याचे चित्र पालटले
120 धावांच्या लक्ष्यासमोर पाकिस्तानचा संघ मजबूत दिसत होता. बाबर आझम सुरुवातीलाच बाद झाला. पण दुसरा सलामीवीर मोहम्मद रिझवान विकेटवर राहिला आणि जोपर्यंत तो राहिला तोपर्यंत पाकिस्तान संघ सामन्यात होता. पण 15 व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या जसप्रीत बुमराहने पहिल्याच चेंडूवर रिजवानला बाद करून भारताला सामन्यात परत आणले. इथून पाकिस्तानचा संघ कमकुवत झाला. याचा परिणाम असा झाला की, दबावामुळे इमाद वसीमला अक्षर पटेलच्या 16व्या षटकात चेंडू योग्यप्रकारे खेळता आला नाही. येथून पुन्हा भारतीय संघाने मागे वळून पाहिले नाही आणि विजय मिळवला.

बुमराहची गोलंदाजी
बुमराहनेही 19 वे षटक टाकले आणि या षटकात तीन धावा देऊन इफ्तिखार अहमदची विकेट घेतली. बुमराहने चार षटकांत 14 धावा देत तीन बळी घेतले. या कारणास्तव त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. या सामन्यात बुमराहने पुन्हा एकदा स्पष्ट केले की त्याला सध्याचा सर्वोत्तम गोलंदाज का म्हटले जाते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!

Previous Post
Dheeraj Ghate | आज खऱ्या अर्थाने पुण्याने दिवाळी साजरी केली - धीरज घाटे

Dheeraj Ghate | आज खऱ्या अर्थाने पुण्याने दिवाळी साजरी केली – धीरज घाटे

Next Post
Muralidhar Mohol | नरेंद्र मोदींची प्रधानमंत्री पदाची शपथ, मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपद! कसबा मतदारसंघात आनंदोत्सव

Muralidhar Mohol | नरेंद्र मोदींची प्रधानमंत्री पदाची शपथ, मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपद! कसबा मतदारसंघात आनंदोत्सव

Related Posts
Supriya Sule | आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही, आम्ही भ्रष्टाचारातून मुक्त झालो; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

Supriya Sule | आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही, आम्ही भ्रष्टाचारातून मुक्त झालो; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

Supriya Sule | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येऊन त्यांनी बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर एक चकार शब्ददेखील काढला नाही केंद्र…
Read More
या गोष्टी रात्री चेहऱ्यावर लावा, काही दिवसात तुम्हाला सुंदर आणि चमकदार त्वचा मिळेल! | glowing skin tips

या गोष्टी रात्री चेहऱ्यावर लावा, काही दिवसात तुम्हाला सुंदर आणि चमकदार त्वचा मिळेल! | glowing skin tips

glowing skin tips | मऊ आणि चमकणारी त्वचा ही प्रत्येकाची आवडती आहे कारण ती आपला लूक सुधारते. तथापि,…
Read More
Amrita Fadnavis - uddhav thackeray

ऐ ‘भोगी ‘, म्हणत अमृता फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (MNS chief Raj Thackeray)  घेतलेली आक्रमक हिंदुत्वाची भूमिका सध्या सर्वत्र चर्चेचा विषय…
Read More