भारत आणि श्रीलंका (IND VS SL) यांच्यात खेळण्यात आलेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने 241 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने भारतीय संघाला वेगवान सुरुवात केली. रोहितच्या विकेटनंतर विराट कोहली फलंदाजीला आला. विराट कोहलीने 11 धावा केल्या की त्याच्याबरोबर काहीतरी घडले. यामुळे श्रीलंकेच्या संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये एक गोंधळ उडाला होता. या व्यतिरिक्त, स्टेडियममध्ये बसलेल्या प्रत्येक श्रीलंकेच्या चाहत्याच्या तोंडावर निराशा झाली.
जेव्हा श्रीलंकेविरुद्ध विराट कोहली फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडियाची ( IND VS SL) चांगली स्थिती होती. सामन्यात परतण्यासाठी श्रीलंकेला विराटची विकेट आवश्यक होती. श्रीलंकेने आपल्या आक्रमक गोलंदाजीला सुरूवात केली. त्यावेळी विराट कोहली 11 धावांवर खेळत होता. यादरम्यान श्रीलंकेचा गोलंदाज अकिला धनंजयने विराटला असा एक चेंडू टाकला ज्यामुळे तो पायचीत झाला असावा असे सर्वांना वाटले. पंचांनीही विराटला पायचीत बाद दिले, परंतु विराटने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला.
#ViratKohli𓃵 Bhai 😂 #India #CricketTwitter #Cricket #SriLanka pic.twitter.com/bsfQgHdcnT
— Priyansh Tripathi (@biggbossott3_v) August 4, 2024
कोहलीच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाल्याची कल्पना मैदानावर उपस्थित असलेल्या कुणालाही नव्हती. खुद्द विराटलाही याची कल्पना नव्हती, पण डीआरएस अल्ट्रा एजमध्ये चेंडू बॅटला स्पर्श झाल्याचे दाखवले. याच कारणामुळे त्याला नाबाद घोषित करण्यात आले. डीआरएसमधील हा निर्णय पाहून श्रीलंकेचे खेळाडूही अवाक् झाले. अगदी पव्हेलियनमधून श्रीलंकेच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यही हा निर्णय पाहून चकित झाले होते.
विराट कोहलीला नाबाद दिल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने पंचांकडे नाराजी व्यक्त केली. श्रीलंकेचा प्रशिक्षक जयसुर्यादेखील आनंदी दिसत नव्हता आणि रिझर्व्ह पंचांशी बोलण्यासाठी ड्रेसिंग रूममधून खाली आला, परंतु पंचांनी आपला निर्णय बदलला नाही. परंतु जीवदान मिळाल्यानंतरही विराट त्याचा फायदा उचलू शकला नाही. विराट 19 चेंडूत केवळ 14 धावा करून बाद झाला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप