टीम इंडियात फूट? भर मैदानात हार्दिकने विराटला दिली अशी वागणूक, व्हिडिओची चर्चा

गुवाहाटी येथील पहिला वनडे सामना (First ODI) जिंकल्यानंतर भारतीय संघाने काल कोलकात्यातील दुसरा वनडे सामनाही ४ विकेट्सने जिंकत मालिका २-० ने खिशात घातली आहे. मात्र सामन्यापेक्षा जास्त भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हार्दिक आणि विराटमध्ये सर्वकाही ठिक नसल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ गुवाहाटी येथील वनडे सामन्याचा आहे.

व्हिडिओत दिसते की, श्रीलंकेच्या फलंदाजाची विकेट गेल्यानंतर सर्व भारतीय खेळाडू मिळून विकेटचा जल्लोष साजरा करत आहेत. यावेळी हार्दिक पंड्या श्रेयस अय्यर, अक्षर पटेलसहित इतर खेळाडूंना हाय फाय करतो. परंतु अगदी त्याच्या समोर उभा असलेल्या विराटवर तो दुर्लक्ष करतो. तो विराटला हाय फाय देत नाही आणि डोक्यावरील टोपी हालवतो. यानंतरही विराट हार्दिककडे पाहून इकडे तरी पाहा असा इशारा करतो. तरीही हार्दिक त्याला दुर्लक्षित करत पुढे निघून जातो. यावर सर्व खेळाडू हार्दिककडे पाहू लागतात.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहे. हार्दिकने विराटला दिलेली वागणूक पाहून दोघांमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे समजत आहे.

https://www.instagram.com/reel/CnPE6NCqh7G/?utm_source=ig_web_copy_link

याच सामन्यात हार्दिक आणि विराटमध्ये अनबन पाहायला मिळाली होती. भारतीय संघाच्या डावातील ४३व्या षटकादरम्यान ही घटना घडली. या षटकातील चौथ्या चेंडूवर विराटने लेग साइडला हलक्या हाताने फटका मारला. चेंडू गॅपमध्ये गेल्याने त्याच्याकडे दोन धावा काढण्याची संधी होती. परंतु नॉन स्ट्राईकवर असलेल्या हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) एक धाव काढल्यानंतर स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यासाठी विराटला दुसरी धाव काढण्यास नकार दिला. हे पाहून दुसरी धाव घेण्यासाठी पळालेला विराट माघारी परतला.

मात्र हार्दिकचे असे वर्तन पाहून विराटचे डोके हटले. त्याने डोळे काढून हार्दिककडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांवरुन त्याच्या मनातील राग स्पष्ट दिसत होता. हार्दिकही त्यावेळी विराटच्या नजरेला नजर देऊ शकला नाही.