IND vs SL: तीन विकेट घेतल्यानंतर सिराजने केला खुलासा, या खेळाडूच्या टिप्स कामी आल्या

IND vs SL:  भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील यशाचे श्रेय यष्टिरक्षक लोकेश राहुलच्या सल्ल्याला दिले, जो येथील ईडन गार्डन्सची खेळपट्टी आणि परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकला.

सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्याने फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर श्रीलंकेचा संघ 39.4 षटकांत 215 धावांत गुंडाळला गेला. सिराजने डावाच्या विश्रांतीदरम्यान सांगितले की, पहिल्या षटकानंतरच चेंडू हलणे थांबल्याचे राहुलच्या लक्षात आले, त्यानंतर अनुभवी श्रीलंकेच्या फलंदाजांच्या विरोधात नवीन रणनीती अवलंबली गेली जी हार्ड लेन्थ चेंडू (Hard length ball) टाकण्याची होती.

सिराजने श्रीलंकेचा सलामीवीर अविष्का फर्नांडो (20) याला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले आणि कुलदीपने विरोधकांच्या मधली फळी उद्ध्वस्त करण्यासाठी निर्माण केलेल्या दबावाचा फायदा घेतला.

सिराज म्हणाला, “लोकेश राहुलने मला सांगितले की एका षटकानंतर चेंडू स्विंग होणे थांबले, म्हणून मी हार्ड लेन्थवर गोलंदाजी केली. फलंदाजीसाठी ती चांगली विकेट होती पण कुलदीपने चांगली गोलंदाजी करत मधल्या फळीचा नाश केला.