महातपुरी परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

महातपुरी / गंगाखेड / विनायक आंधळे :- देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amrit Mahotsav) या संकल्पनेवर देशभर आनंदोत्सव साजरा केला जात आहे. 15 ऑगस्ट 1949 रोजी देश ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचा राष्ट्रध्वज (National Flag) लाल किल्ल्यापासून ते देशातील सरकारी कार्यालयापर्यंत फडकावला जातो.

महातपुरी (Mahatpuri) मध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र दिन (Independence Day) उत्साहात साजरा करण्यात झाला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 06-30 वाजता गावातील बस स्टॉप पासून ते मुख्य चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी, भारत माता की जय, वंदे मातरम (Bharat Mata Ki Jai, Vande Mataram) अशा देशभक्तिपर घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला.

यानंतर, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पथ संचलन व लेझीम पथक रॅलीत सहभागी झाले होते. गावातील मुख्य ठिकाणी ध्वजारोहण झाले व नंतर जिल्हा परिषद शाळेत जुन्या नाण्याचे प्रदर्शन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम (Cultural events) घेण्यात आले. यावेळी गावातील तरुण, नागरिक, माता, भगिनी, विद्यार्थी, शाळेतील शिक्षकवृंद, कर्मचारी उपस्थित होते.