भारताचे क्षेपणास्त्र चुकून सव्वाशे किलोमीटर पाकिस्तानात घुसले ; पाकडे संतापले

 नवी दिल्ली-  भारताचे क्षेपणास्त्र 9 मार्चला पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याचे संरक्षण मंत्रालयाने मान्य केलंय. ही घटना अपघातामुळे घडल्याचे निवेदन संरक्षण मंत्रालयाने जारी केलंय. 9 मार्च 2022ला नियमित देखभाली दरम्यान तांत्रिक कारणांमुळे घडली. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून कोर्ट ऑफ चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटलंय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे भारताने म्हटलंय.

पाकिस्तानने या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून, भारताने उत्तर देण्याची मागणी केली आहे. याशिवाय पाककडून भारताला इशारा देण्यात आला आहे. अशा हलगर्जीपणासाठी मोठी किंमत चुकवावी लागू शकते, असं पाकिस्तानने म्हटले आहे.  या मिसाईलच्या मार्गात भारत आणि पाकिस्तान दोन्हीच्या हवाई हद्दीतल्या अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स होत्या. त्यामुळे अनेक जिवांना तसंच साधनसंपत्तीला धोका निर्माण झाला होता,असंही पाकिस्तानचे लष्करी प्रवक्ते मेजर-जनरल बाबर इफ्तिखारो यांनी गुरुवारी सांगितलं.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना ९ मार्चला सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घडली हाेती. नियमित देखभालीदरम्यान तांत्रिक चुकीमुळे एक क्षेपणास्त्र डागले गेले आणि ते पाकिस्तानी हद्दीत १२४ किलाेमीटरवर पडले. त्यावर काेणतीही शस्त्रे किंवा स्फाेटके नव्हती. त्यामुळे काेणतीही प्राणहानी झालेली नाही, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे.