भारत हे हिंदू राष्ट्र आहे, भारत हे हिंदू राष्ट्र होते आणि हिंदू राष्ट्रच राहील – धीरेंद्र कृष्ण शास्त्री

Dhirendra Shastri : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) सध्या खूप चर्चेत आहेत. वादांसोबतच बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची लोकप्रियताही वाढत आहे. या सगळ्यात शास्त्री यांनी एक लक्ष्यवेधी वक्तव्य केले आहे. भारत हे हिंदू राष्ट्र आहे (India is a Hindu nation), फक्त घोषणेची गरज आहे असं त्यांनी म्हटले आहे.

आज तक या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, भारत हे हिंदू राष्ट्र आहे, भारत हे हिंदू राष्ट्र होते आणि हिंदू राष्ट्रच राहील, फक्त घोषणेची गरज आहे. ते म्हणाले की, मध्ये एक छोटी रेषा आहे, ती रेषा ओलांडण्यासाठी मी आवाज उठवला आहे.

बागेश्वर धामचे प्रमुख म्हणतात, “अशी संकल्पना, असे ध्येय भारतात ठेवले आहे, म्हणून भारत हिंदू राष्ट्र होता, आहे आणि राहील. जे अहिंसेचे उपासक आहेत त्यांना आमच्या या विधानाने नक्कीच राग आला असेल आणि त्यांना राग आला असेल तर त्यांची मानसिक तपासणी करून घ्यावी. त्याचा हिंदू-मुस्लिमशी काहीही संबंध नाही, असेही ते पुढे म्हणाले. ते म्हणाले, “प्रत्येक पंत, पंथाबद्दल आमची सद्भावना आहे आणि प्रत्येक धर्माबद्दल आमची श्रद्धा आणि आदर आहे, पण सनातनबद्दल कट्टरता आहे.