या दशकाच्या अखेरपर्यंत भारत ही तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल – मुर्मू

मुंबई – या दशकाच्या अखेरपर्यंत भारत ही तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या तीन दिवसांच्या सर्बियाच्या दौऱ्यादरम्यान सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला. यावेळी भारतात पायाभूत सुविधांचा विकास वेगानं होत असून 2047 या वर्षापर्यंत भारत विकसित देश होईल, असं मुर्मू म्हणाल्या.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या वाढत असून हे बदलतं गुणोत्तर आशादायी असून महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचंही राष्ट्रपती म्हणाल्या. कालच्या कार्यक्रमाच्या आधी ओडीशामध्ये झालेल्या रेल्वे अपघातामधील दगावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुर्मू यांच्या बरोबर या दौऱ्यादरम्यान 20 उद्योजकांचं शिष्टमंडळ असून दोन्ही देशांमध्ये उद्योग क्षेत्रात सहकार्याच्या संधींचा शोष घेण्यात आहे.