पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड्स भारतीय सैन्याने केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली |  जम्मूजवळील पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड्स भारतीय सैन्याने उद्ध्वस्त (india pakistan war ) केल्याचं संरक्षण सूत्रांनी जाहीर केलं आहे. या ठिकाणांवरून ट्यूब-लाँच प्रकारचे ड्रोन भारतात सोडले जात होते, अशी माहितीही मिळाली आहे.

तसंच काल रात्री बारामुल्ला ते भुज दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या मालिकेला भारतीय संरक्षण दलांनी यशस्वीरित्या उधळून (india pakistan war ) लावलं आहे.

ड्रोन हल्ल्यांचा व्यापक प्रादुर्भाव

संशयित हल्लेखोर ड्रोन हे नागरी आणि लष्करी ठिकाणांसाठी धोकादायक ठरू शकले असते. हे ड्रोन बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नागरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, जैसलमेर, बारमेर, भुज आणि लाखी नाला परिसरात दिसून आले.

फिरोजपूरमध्ये नुकसान, तिघे जखमी

फिरोजपूरमध्ये एक ड्रोन हल्ला यशस्वी झाला असून एका घराचं नुकसान झालं आणि तीन जण जखमी झालेत. सध्या त्या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे.

ड्रोन-विरोधी तंत्रज्ञान सक्रीय

भारतीय लष्कर ड्रोन-विरोधी प्रणालीचा वापर करून सर्व हवाई धोक्यांचा मागोवा घेत आहे. सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना घरातच राहण्याचं आणि अनावश्यक हालचाली टाळण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून तातडीची कारवाईही सुरु आहे, असं लष्करी सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

रात्रीच का होतात एअर स्ट्राईक? कारण जाणून थक्क व्हाल!

‘आम्ही तणाव वाढवत नाही, पण प्रत्युत्तर देणारच’; भारताचा स्पष्ट इशारा

दिल्ली सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द

Previous Post
पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय सैन्याने ड्रोन पाडले

पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय सैन्याने ड्रोन पाडले

Next Post
पाकिस्तानकडून पसरवल्या जाताहेत अफवा; नागरिकांना माहितीची शहानिशा करण्याचं आवाहन

पाकिस्तानकडून पसरवल्या जाताहेत अफवा; नागरिकांना माहितीची शहानिशा करण्याचं आवाहन

Related Posts
सकाळी नाश्त्याला बनवा Oats Dhokla, चवीसोबतच आठवड्यात वजन कमी होण्यास मदत होईल!

सकाळी नाश्त्याला बनवा Oats Dhokla, चवीसोबतच आठवड्यात वजन कमी होण्यास मदत होईल!

Oats Dhokla: लोकांना नाश्त्यात ढोकळा हा गुजराती पदार्थ खूप आवडतो. बेसनापाठोपाठ आता रव्याचे ढोकळेही चवीने खायला लागले आहेत.…
Read More
मंत्रालयातील कंत्राटी कामगारांना सहा महिने पगार नाही ही गंभीर बाब ;त्यांची देणी तातडीने द्या - सुळे

मंत्रालयातील कंत्राटी कामगारांना सहा महिने पगार नाही ही गंभीर बाब ;त्यांची देणी तातडीने द्या – सुळे

मुंबई  – मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप…
Read More
विनोदवीर संतोष चोरडिया यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन; कलेला समाजसेवेची जोड देणारा कलाकार हरपला

विनोदवीर संतोष चोरडिया यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन; कलेला समाजसेवेची जोड देणारा कलाकार हरपला

Santosh Chordia  : ‘आम्ही एकपात्री’ या संस्थेच्या माध्यमातून एकपात्री कलाकारांची मोट बांधून त्यांच्या समस्या आणि गाऱ्हाणी सरकार दरबारी…
Read More