Indian Art Promoters | २४ ते २६ मे दरम्यान कला स्पंदन आर्ट फेअरचे आयोजन

Indian Art Promoters | २४ ते २६ मे दरम्यान कला स्पंदन आर्ट फेअरचे आयोजन

Indian Art Promoters | कला क्षेत्रात आपल्या देशात असलेले वैविध्य अनुभविण्याची आणि त्याचा आस्वाद घेण्याची संधी पुणेकर कलारसिकांना उपलब्ध होणार आहे. इंडियन आर्ट प्रमोटर्स यांच्या वतीने येत्या शुक्रवार दि २४ ते रविवार दि २६ मे दरम्यान वकील नगर डी पी रस्ता येथील सिद्धी बँक्वेट्स येथे दुपारी १२ ते रात्री ९ दरम्यान कला स्पंदन आर्ट फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनी सर्वांसाठी विनामूल खुली आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

कला स्पंदन आर्ट फेअरचे पुण्यातील हे सलग दुसरे वर्षे असून यावर्षीच्या फेअरचे उद्घाटन शुक्रवार दि २४ मे रोजी सायं ५ वाजता रॉयल सुरगाणा प्रिन्सली स्टेटचे महाराज कुमार श्रीमंत महाराज रोहितरावराजे देशमुख पवार आणि आंतरराष्ट्रीय पाहुण्या ऑलिव्हिया फर्नांडिस यांच्या उपस्थित संपन्न होईल, अशी माहिती इंडियन आर्ट प्रमोटर्सचे (Indian Art Promoters) संस्थापक आणि आयोजक सुदीप चक्रवर्ती यांनी कळविली आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना सुदीप चक्रवर्ती म्हणाले, “कला स्पंदन आर्ट फेअर हे देशातील प्रमुख कला प्रदर्शनांपैकी एक असून समकालीन कलेसाठी हे एक हक्काचे व्यासपीठ आहे. या प्रदर्शनीमध्ये पुणेकरांना जागतिक दर्जाची कला पाहता आणि अनुभविता येईल यासोबतच प्रदर्शनीमध्ये सहभागी कलाकार, कला मास्टर्स यांच्याशी देखील पुणेकरांना थेट संवाद साधला येईल हे ही या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य आहे.”

या कला प्रदर्शनामध्ये व्यावसायिक आणि हौशी कलाकारांनी साकारलेल्या अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग्ज, अलकोहोल इंक आर्ट, वॉटर, ऑईल, अॅक्रॅलिक आणि मिक्स मिडीयम पेंटिंग्ज, रेझिन आर्ट, सिरॅमिक आर्ट, डेकोरेटिव्ह आर्ट, पारंपारिक कला पुणेकरांना अनुभविता येणार आहे. ज्यामध्ये देशभरातील १५० कलाकार आणि कलादालने आपल्या तब्बल १५०० हून अधिक कलाकृती सादर करतील.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Pawan Khera | नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला, मुद्देच नसल्याने धार्मिक ध्रुविकरणाचा प्रयत्न

Pawan Khera | नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला, मुद्देच नसल्याने धार्मिक ध्रुविकरणाचा प्रयत्न

Next Post
Prakash Ambedkar | मोदीने स्वतःचे व्यक्ती महत्व वाढवण्यासाठी लोकांचे वाटोळं केले, प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

Prakash Ambedkar | मोदीने स्वतःचे व्यक्ती महत्व वाढवण्यासाठी लोकांचे वाटोळं केले, प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

Related Posts
RBI जुन्या फाटलेल्या नोटांचे काय करते, जाणून घ्या संपूर्ण तपशील

RBI जुन्या फाटलेल्या नोटांचे काय करते, जाणून घ्या संपूर्ण तपशील

नवी दिल्ली : भारतातील चलनी नोटांचा इतिहास खूप जुना आहे. यामध्ये वेळोवेळी अनेक बदल झाले आहेत. भारतात गेल्या…
Read More

बांगलादेशला ५ विकेट्सने हरवत पाकिस्तानची उपांत्य फेरीत धडक, भारताचेही तिकीट पक्के

Semi Finals: टी२० विश्वचषक २०२२ चा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. रविवारी (०६ नोव्हेंबर) टी२० विश्वचषकाच्या साखळी फेरीचा…
Read More
 भक्ताने पीएम मोदींच्या आईच्या वजनाइतके सोने केले दान, काशी विश्वनाथाचा दरबार झळाळला 

 भक्ताने पीएम मोदींच्या आईच्या वजनाइतके सोने केले दान, काशी विश्वनाथाचा दरबार झळाळला 

 वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसीशी अतूट नाते आहे.  PM मोदींनी जगातील सर्वात जुने शहर काशीलाही आपल्या ड्रीम…
Read More