Indian Team | राहुल द्रविड यांच्यानंतर भारताच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी कोण घेणार? दोन वेगवेगळे कोच असणार का?

टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडिया मध्ये (Indian Team) मोठा बदल होण्याची खात्री आहे. बीसीसीआयने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. सोमवारी बीसीसीआयने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर ही माहिती दिली. बोर्डाचे सचिव जय शाह यांनी नुकतेच टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळेल, असे विधान केले होते.

आता राहुल द्रविड पुन्हा अर्ज करतो की नाही हे पाहायचे आहे. त्याने अर्ज न केल्यास भारतीय संघाला (Indian Team) नवा प्रशिक्षक मिळेल. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकानंतर द्रविडचा करार संपला होता. मात्र, त्यानंतर बीसीसीआयने त्याच्याशी बोलून त्याला या वर्षीच्या टी-20 विश्वचषकापर्यंत आपल्या पदावर कायम राहण्यास सांगितले होते.

यानंतर आता द्रविडचा उत्तराधिकारी कोण असेल, अशी चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये रंगली आहे. बीसीसीआय मुख्य प्रशिक्षक पदासाठी 3.5 वर्षाचा करार करण्याला प्राधान्य देत आहे. पण याआधी ज्या नामांकित कोचशी बोलणं झालं ते राष्ट्रीय संघासाठी 10 महिने, वर्षभरासासाठी करार करायला सुद्धा काचकूच करत होते. सर्व फॉर्मेटमध्ये राष्ट्रीय संघाचं व्यवस्थापन करताना वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल कोचेसनी चिंता व्यक्त केली. आयपीएल तसेच अन्य छोट्या फॉर्मेटमध्ये पैसा उत्तम मिळतो, शिवाय भरपूर वेळ देण्याची सुद्धा गरज नसते. त्यामुळे राष्ट्रीय संघाच्या कोच पदासाठी उत्सुक असणाऱ्यांची संख्या कमी आहे. पुढच्या तीन वर्षांचं टीम इंडियाचं वेळापत्रक एकदम व्यस्त आहे. त्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करुन स्पिल्ट कोचिंग म्हणजे वेगवेगळ्या कोचचा विचार पुढे आला होता.

बीसीसीआयने नुकत्याच जारी केलेल्या रिलीजमध्ये आपली भूमिका एकदम स्पष्ट केली आहे. वेगवेगळ्या कोचेसचा पर्याय फेटाळून लावत सर्व फॉर्मेटसाठी एकच कोच हवा असल्याच स्पष्ट केलय. स्पिल्ट कोचिंग नसल्यामुळे परदेशी कोच फार उत्साह दाखवणार नाहीत असं दिसतय. कारण भारतात आयपीएलमध्ये परदेशी कोचेस पैसा कमावून घेतात. बीसीसीआयला शेवटी आपल्याच नावाजलेल्या खेळाडूंवर कोचिंगसाठी अवलंबून रहाव लागेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप