Indian Women Cricket | भारताच्या दोन वाघिणींची डरकाळी! एकाच सामन्यात हरमनप्रीत आणि स्मृतीने ठोकली शतके

भारतीय महिला क्रिकेट संघाची (Indian Women Cricket) कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती यांनी शानदार शतके झळकावली. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी केली आणि भारताची धावसंख्या 300 च्या पुढे नेली. हरमनप्रीत कौरचा स्कोअर 49.2 षटकात 88 धावा होता. यानंतर तिने दोन चौकार आणि एक षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले. हरमन आणि मंधाना यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने (Indian Women Cricket) 3 गडी गमावून 325 धावा केल्या.

हरमनप्रीत कौरने बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या वनडेत 87 चेंडूत शतक झळकावले. हरमनप्रीत कौर 88 चेंडूत 103 धावा करून नाबाद परतली. यादरम्यान तिने 9 चौकार आणि 3 षटकार मारले. रिचा घोष 13 चेंडूत 25 धावा करून नाबाद परतली. 192 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. याआधी स्मृती मंधानाने 103 चेंडूत कारकिर्दीतील सातवे वनडे शतक पूर्ण केले. या काळात मंधानाने मिताली राजच्या विक्रमाची बरोबरी केली. भारतासाठी वनडेमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम मितालीच्या नावावर होता, जो आता स्मृती मानधना आणि मिताली यांच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून नॉनकुलुलेको मलाबाने 51 धावांत 2 बळी घेतले.

मंधानाने सलग दुसऱ्या वनडेत शतक झळकावले
स्मृती मानधनाने या मालिकेत सलग दुसरे शतक झळकावले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिने 117 धावांची खेळी केली होती. भारताने पहिला वनडे 143 धावांनी जिंकला होता. टीम इंडिया दुसरी वनडे जिंकून मालिका जिंकू शकते. एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामनाही खेळवला जाणार आहे. कसोटी सामन्यानंतर, दोन्ही संघ 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत आमनेसामने येतील, जे आगामी टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like