कानपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND VS BAN) भारतीय संघाने बांगलादेशचा 7 विकेट्सने पराभव केला. कानपूर कसोटी जिंकण्यासोबतच टीम इंडियाने बांगलादेशचा दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभव केला. ही कसोटी मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. रोहित ब्रिगेडने असा पराक्रम केला जो आजपर्यंत जगातील इतर कोणत्याही संघाला करता आलेला नाही.
भारताने घरच्या मैदानावर सलग 18वी कसोटी मालिका जिंकली
खरं तर, नोव्हेंबर 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाला मायदेशात एकही पराभव पत्करावा लागलेला नाही. बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका जिंकून भारताने हा विक्रम कायम राखला. टीम इंडियाने 12 वर्षांपासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. मायदेशात झालेल्या गेल्या 51 कसोटी सामन्यांमध्ये भारताने केवळ 4 सामने गमावले आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाने 2012 पासून घरच्या मैदानावर 40 कसोटी सामने जिंकले आहेत. या कालावधीत 7 कसोटी सामने अनिर्णित राहिले.
आता बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका (IND VS BAN) जिंकून भारतीय संघाने एक मोठा विक्रम केला आहे. मायदेशात सर्वाधिक 18 वेळा कसोटी मालिका जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. भारतीय कसोटी संघानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे, ज्याने मायदेशात सलग 10 कसोटी मालिका दोनदा जिंकण्याचा विक्रम केला होता.
भारताने बांगलादेशचा कसोटी मालिकेत व्हाईटवॉश केला
भारताने बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 280 धावांनी जिंकला होता. त्या सामन्यात आर अश्विनने 113 धावा केल्या होत्या आणि भारताकडून पहिल्या डावात रवींद्र जडेजाने 86 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात शुभमन गिलने 119 आणि ऋषभ पंतने 109 धावा केल्या. कानपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशचा ७ विकेट्सने पराभव केला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी | CM Eknath Shinde
‘महाराष्ट्र विधानसभा २०२४ विजय संकल्प संमेलना’चे मुंबईत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
उद्योगस्नेही धोरणामुळे परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर | Uday Samant