इंदोरीकर महाराजांच्या सासूबाईंचा जबरदस्त विजय, शशिकला पवार निळवंडे सरपंचपदी विराजमान

मुंबई : राज्यात 34 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीची रणधुमाळी पाहायला मिळाली आहे. 34 जिल्ह्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी रविवारी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. आज या निवडणुकीची मतमोजणी झाली असून गावचा सरपंच कोण हे ठरलं आहे.(Maharashtra Gram Panchayat Election).

दरम्यान, किर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या (Indurikar Maharaj) सासूबाई (Mother-in-Law) सरपंचपदी (Sarpanch) विराजमान झाल्या आहेत. अपक्ष उमेदवारी दाखल करत इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार  (Shashikala Shivaji Pawar) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत (Nilwande Gram Panchayat) निवडणुकीत झालेल्या दुरंगी लढतीत शशिकला शिवाजी पवार विजयी झाल्या आहेत.

शशिकला पवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुशीला उत्तम पवार यांच्यावर 227 मतांनी विजय मिळवला आहे. नारळ या चिन्हावर निवडणूक लढवत शशिकला पवार या निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.