Indresh Kumar | जे अहंकारी होते, त्यांना प्रभू रामाने २४० वर अडवलं, संघाची भाजपावर टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. इंद्रेश कुमार यांनी थेट भाजपाला टोला लगावला आहे. “ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता, त्यांना प्रभू रामाने २४० च्या संख्येवर मर्यादित ठेवले”, असे वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केले.राजस्थानमधील जयपूरजवळच्या कनोटा येथे एका कार्यक्रमातते बोलत होते.

इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी म्हटले, “ज्यांनी आजवर प्रभू रामाची भक्ती केली, ते अहंकारी बनत गेले. ज्यांनी स्वतःला सर्वात मोठा पक्ष असल्याचे जाहीर केले, त्यांना प्रभू रामाने २४० जागांवर अडवले. त्यांचा अहंकार यासाठी कारणीभूत ठरला.” लोकसभेच्या निकालानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनीही सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त करणारे भाष्य केले होते. त्यानंतर आता इंद्रेश कुमार यांनीही भाजपाला टोला लगावला आहे.

इंद्रेश कुमार यांनी फक्त भाजपाच नाही तर काँग्रेसलाही टोला लगावला. भाजपाप्रमाणेच काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नाव न घेता ते म्हणाले, ज्यांनी प्रभू रामावर श्रद्धा ठेवली नाही. प्रभू रामाला विरोध केला. त्यांनाही २३४ वर मर्यादित राहावे लागले. देवाचा न्याय असा असतो.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like