INDvAUS 1st Test: टीम इंडियाचे शेपूट वळवळले, पहिला डाव ४०० धावांवर संपला; इतक्या धावांची घेतली आघाडी

INDvsAUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नागपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज (११ डिसेंबर) तिसरा दिवस आहे. या दिवसाच्या सुरुवातीला लंच ब्रेकपर्यंत भारताचा पहिला डाव गुंडाळला गेला. कर्णधार रोहित शर्माच्या चिवट झुंजीनंतर भारताचे शेपूट वळवळले. अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी दमदार प्रदर्शन करत संघाला ४०० धावांपर्यंत पोहोचवले. परिणामी यजमानांनी पहिल्या डावात २२३ धावांची आघाडी घेतली आहे.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

ऑस्ट्रेलियाच्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार रोहित शर्माने झुंजार खेळी केली. एका बाजूने विकेट्स जात असताना त्याने बचावात्मक खेळ खेळला. २ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने १२० धावांची खेळी करत त्याने संघाला संकटातून बाहेर काढले. रोहितनंतर चांगली धावसंख्या उभा करण्याचे शिवधनुष्य रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी पेलले.

जडेजाने १८५ चेंडूत ७० धावा केल्या. या खेळीसाठी त्याने ९ चौकार मारले. तर अक्षर पटेलनेही १७४ चेंडूत १ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ८४ धावा फटकावल्या. शेवटी मोहम्मद शमीनेही ४७ चेंडूत ३७ धावा करत धावफलक हालता ठेवण्यात हातभार लावला. अखेर १३९.३ षटकात भारतीय संघ ४०० धावा करत सर्वबाद झाला. आता भारताकडे २२३ धावांची आघाडी आहे.