Arjun Tendulkar | रणजी ट्रॉफी प्लेट लीगचा अंतिम सामना २३ जानेवारीपासून दिमापूर येथील नागालँड क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या अंतिम सामन्यात गोवा आणि नागालँड हे संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघ एकमेकांना कडक स्पर्धा देत आहेत. पण या अंतिम सामन्यात गोव्याच्या प्लेइंग ११ बद्दल बरीच चर्चा आहे. ज्यामध्ये चांगली आकडेवारी असूनही, सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) गोव्याच्या प्लेइंग ११ मधून वगळण्यात आले.
रणजी ट्रॉफी प्लेट लीगमधील अर्जुनची आकडेवारी
रणजी ट्रॉफी प्लेट लीगच्या अंतिम सामन्यापूर्वी चार सामने खेळवण्यात आले. ज्यामध्ये अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग ११ मध्ये ठेवण्यात आले होते. त्याने शानदार गोलंदाजीही केली. अर्जुनने या ४ सामन्यांमध्ये १८.१८ च्या सरासरीने १६ विकेट्स घेतल्या. त्याचा गोलंदाजीचा स्ट्राईक रेट ३६ होता. अर्जुनचे नाव रणजी ट्रॉफी प्लेट लीगच्या टॉप १० गोलंदाजांमध्ये समाविष्ट आहे आणि या टॉप १० मध्ये त्याचा दुसरा सर्वोत्तम स्ट्राईक रेट आहे.
रणजी ट्रॉफी प्लेट लीगमध्ये अर्जुन तेंडुलकरने गोव्याविरुद्ध दोन्ही डावात ६ विकेट्स घेतल्या. यानंतर त्याने नागालँडविरुद्ध ३ विकेट्स घेतल्या. त्याने मिझोरामविरुद्ध २ आणि अरुणाचल प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात २.७७ च्या इकॉनॉमीने ५ विकेट्स घेतल्या.
अर्जुन २०२५ च्या आयपीएलमध्ये खेळेल का?
अलीकडेच, अर्जुनने आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्ससोबत पुन्हा करार केला. फ्रँचायझीने त्याला ३० लाख रुपयांना आपल्या संघात समाविष्ट केले. अर्जुनचा आयपीएल प्रवास २०२० मध्ये नेट बॉलर म्हणून सुरू झाला. २०२१ मध्ये, मुंबई इंडियन्सने त्याला २० लाख रुपयांना करारबद्ध केले आणि २०२२ मध्ये त्याला ३० लाख रुपयांना कायम ठेवले. २०२३ मध्ये, त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत ५ सामन्यांमध्ये ३ विकेट घेतल्या आहेत.
नागालँड विरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी गोवा संघाचा प्लेइंग ११
रोहन कदम, सुयश प्रभुदेसाई, कृष्णमूर्ती सिद्धार्थ, स्नेहल कौठणकर, कश्यप बखले, दर्शन मिसाळ (कर्णधार), समर दुभाशी, मोहित रेडकर, अमूल्य पांड्रेकर, फेलिक्स आलेमाव, हेरंब परब
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
महाराष्ट्रात सातत्याने भ्रष्टाचार होतोय मग त्याची चौकशी का होत नाही? – Supriya Sule