गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक

सोलापूर- प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांची पत्रकार परिषद सुरू असताना ,संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे शाईफेक करून त्यांना काळे फासण्याचा प्रयत्न केला आहे. संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांकडून हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.

सोलापूरमध्ये अॅड. सदावर्ते यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी सुरू होताच काही कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्यावर शाई फेक केली. सोलापुरातील पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर येथे ही घटना घडली.संविधान दिना दिवशी माझ्यावर काळे फेकले याचा मी निषेध करतो असा तीव्र संताप गुणवंत सदावर्ते यांनी केला आहे.