राहुल शेवाळेच किती वेळा पाकिस्तान, दुबईला गेले याची चौकशी करा; पीडित महिलेची धक्कादायक मागणी 

  नवी दिल्ली –  खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचे आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने स्वत:चे व्हिडिओ ट्विट करत बलात्कार प्रकरणी न्याय देण्याची मागणी केली. तसेच, राहुल शेवाळेच किती वेळा पाकिस्तान, दुबईला गेले याची एनआयए चौकशी करण्याची मागणी केली आहे.(Inquire how many times Rahul Shewale went to Pakistan, Dubai; Shocking demand of the victim woman).

मी फॅशन डिझायनर असून, दुबईत माझ्या करिअरला सुरुवात केली. दुबईत भारतीय, पाकिस्तानी, बांग्लादेशी आणि अमेरिकन माझे मित्र होते. एनआयएने माझे फोन डिटेल्स तपासून पाहावे. दुबईतही मी याविरोधात आवाज उठवल्यावर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करत जेलमध्ये टाकण्यात आलं. दुबईत मला भेटण्यास आल्यानंतर राहुल शेवाळे कुठे जात होते. किती वेळा कराची आणि पाकिस्तानला गेले आहेत. कोणत्या देशात गेले, याचा तपास एनआयएने करावा,” अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.

आपल्या राजकीय ताकदीचा आणि संबंधांचा वापर करत राहुल शेवाळे हे मला सतत जीवे मारण्याची धमकी देत आहेत. आतापर्यंत दोन वेळा जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. याशिवाय खोट्या तक्रारीही केल्या आहेत. याविरोधात मी आवाज उठल्यावर माझ्याविरोधात निराधार आरोप केले जात आहेत. राहुल शेवाळेंचे दोन वर्षे माझ्यासोबत संबंध होते. मला लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि आमचे संबंध तयार झाले होते, असा आरोप तरुणीने केला आहे.