दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या! राष्ट्रवादीची प्रसाद लाड यांच्यावर टीका

Mumbai – छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलं आहे. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या निमित्तानं आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लाड यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रवादीची टीका

राष्ट्रवादीच्या ट्विटर हॅन्डलवरून प्रसाद लाड यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. “भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असं विधान केलं. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या!”, असं ट्विट राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आलं आहे.

 

 

प्रसाद लाड यांचं वक्तव्य

“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय.