ICC ला ऑनलाईन गंडा, तब्बल २० कोटींचा लागला चुना? वाचा सविस्तर

आनलाईन पेमेंट (Online Payment) आणि बँकिंगचा जसजसा वापर वाढत आहेत तसतेसे ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे (Online Fraud) प्रकारही वाढत आहेत. तुमच्या आमच्या सारखे सामन्य लोकं तर रोजच ऑनलाईन फ्रॉडचे बळी पडतात. मात्र आता मोठमोठ्या संस्था ज्यांच्याकडे अशा फ्रॉडला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक असलेली साधन सामुग्री आणि तंत्रज्ञान आहे त्या देखील अशा ऑनलाईन फ्रॉडला बळी पडत आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थातच आयसीसीसोबत झालेल्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रकरण (ICC Duped Online) समोर आले आहे, ज्यात काही लोकांनी पेमेंटसाठी आयसीसी सल्लागाराच्या नावाने बनावट ईमेल आयडी तयार केली. त्यानंतर व्हाउचरच्या स्वरूपात ही फसवणूक केली. दुबई कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याने या विषयावर आपले प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे, परंतु क्रिकबझच्या अहवालावर विश्वास ठेवला तर आयसीसीने त्याची चौकशी सुरू केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार आयसीसीला 2.5 मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास 20 कोटींचा आनलाईन चुना लागला असण्याची शक्यता (ICC Online fraud) आहे. आयसीसीची अशा प्रकारे ऑनलाईन फसवणूक ही पहिल्यांदाच झाली नसून गेल्या काही काळापासून जवळपास चारवेळी त्यांना असा चुना लागला आहे.

दुबईमधील कार्यालयात बसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ध्यानीमनी नसताना गुरूवापर्यंत ते ऑनलाईन फसवणुकीचे शिकार होत होते. दरम्यान, आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. त्यांनी याप्रकरणी अजून चौकशी सुरू असल्याचे कारण दिले. मात्र टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील एका पार्टीला पेमेंट झाले आहे. ही पार्टी आयसीसीचे व्हेंडर असल्याचा दावा केला जात आहे.

फसवणूक करणाऱ्याने आयसीसीच्या मेल आयडी सारखाच इमेल आयडी वापरला होता. या घोटाळ्यानंतर आयसीसी सदस्याने मोठा धक्काच बसला. आयसीसी सदस्या देशांची जवळपास 20 कोटी रूपये रक्कम गायब झाली आहे.