टाटा समूहाच्या या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे श्रीमंत झाले, 1 लाखाचे झाले 7.96 कोटी

मुंबई – इंग्रजीत एक म्हण आहे, ‘सक्सेस टेक्स टाइम’. मग तो तुमच्या व्यवसायात (Business) असो, करिअर (Career) असो किंवा शेअर मार्केटमधून (Share Market) पैसे कमावण्यामध्ये असो. अशीच कथा टाटा समूहाच्या शेअरची आहे. या शेअ रमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सुरुवातीच्या गुंतवणूकदारांनी भरपूर कमाई केली आहे. टाटा समूहाची कंपनी (Tata group company)टायटनने गेल्या २० वर्षांत ७९,६१२.९% परतावा दिला आहे.

टायटन (Titan) हा घड्याळाचा प्रसिद्ध ब्रँड आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या तोट्यात आहेत. मात्र, कंपनीचा आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर, कंपनीने कधीही आपल्या गुंतवणूकदारांना तोट्यात राहू दिले नाही. या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 वर्षांपूर्वी म्हणजे 2003 मध्ये एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 7.96 कोटी रुपये झाले असते, कारण जानेवारी 2003 मध्ये एका शेअरची किंमत 3.10 रुपये होती, ती वाढून 2,468.20 रुपये प्रति शेअर झाली आहे.