IPL 2023: आता IPLपूर्वी या संघाने मारला मास्टर स्ट्रोक, दिग्गजांची संघात एन्ट्री

IPL 2023 : आयपीएल 2023 सीझन सुरू होण्यासाठी अजून काही वेळ बाकी आहे. आयपीएलसाठी लिलाव झाला आणि सर्व संघांनी खेळाडूंना खरेदी केले. आयपीएलचा पुढील हंगाम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल, असे मानले जात आहे. बीसीसीआयने (BCCI) अद्याप याची घोषणा केलेली नसली तरी पण संघांनी आणखी वेगाने तयारी सुरू केली आहे.

यातच आता पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) संघाने मास्टर स्ट्रोक खेळताना मोठी घोषणा केली आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) यावेळी प्रथमच पंजाब किंग्जचे कर्णधारपद भूषवताना दिसणार असून, संघाने फिरकी विभाग आणखी मजबूत करताना सुनील जोशीला फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सुनील जोशीने (Sunil Joshi) 1996 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले आणि 2001 पर्यंत खेळत राहिले. यादरम्यान त्याने भारतासाठी 15 कसोटी आणि 69 एकदिवसीय सामने खेळले. त्याच्या नावावर कसोटीत 41 आणि एकदिवसीय सामन्यात 69 बळी आहेत. एवढेच नाही तर सुनील जोशी स्वतः आयपीएलही खेळले आहेत. ते 2008 आणि 2009 मध्ये RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून IPL खेळले आहेत.

सुनील जोशी यांनी याआधी अनेक संघांना प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. रणजीमध्ये ते हैदराबाद, जम्मू काश्मीर, आसाम आदी संघांचे प्रशिक्षक राहिले आहेत. आता पंजाबचा संपूर्ण संघ खेळाडूंपासून कोचिंग स्टाफपर्यंत जवळजवळ तयार झाला आहे. याआधी अनिल कुंबळे (Anil Kumble) संघाचे मुख्य प्रशिक्षक असायचे, पण आता तेही वेगळे झाले आहेत. यानंतर आता ट्रॅव्हल बेलिस संघाचे नवे प्रशिक्षक आहेत. पंजाब हा असा संघ आहे, ज्याला एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. आता शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाबचा (Punjab) संघ प्रथमच आयपीएल जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यावेळी संघाची कामगिरी कशी होते हे पाहावे लागेल.