IPL 2024 | आयपीएल चॅम्पियन केकेआरवर पैशांचा पाऊस, सनरायझर्स हैदराबादलाही मिळाले कोटी, पुरस्कारांची संपूर्ण यादी

IPL 2024 | आयपीएल चॅम्पियन केकेआरवर पैशांचा पाऊस, सनरायझर्स हैदराबादलाही मिळाले कोटी, पुरस्कारांची संपूर्ण यादी

IPL 2024 | इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 17वा हंगाम संपला आहे. रविवारी (26 मे) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) आठ गडी राखून पराभव केला. या सामन्यात कोलकाता संघाला विजयासाठी 114 धावांचे माफक लक्ष्य होते, जे त्यांनी 11व्या षटकात पूर्ण केले. कोलकाता संघ तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनला आहे.

आयपीएल 2024 च्या (IPL 2024) अंतिम सामन्यानंतर, एक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला ज्यामध्ये विजेता आणि उपविजेत्या संघांवर पैशांचा वर्षाव करण्यात आला. याशिवाय स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली. विजेत्या संघ कोलकाता नाईट रायडर्सला 20 कोटी रुपये, तर उपविजेत्या सनरायझर्स हैदराबादला 12.50 कोटी रुपये मिळाले.

आयपीएल 2024 मधील टॉप-4 संघांची बक्षीस रक्कम

* विजेता संघ (कोलकाता नाईट रायडर्स) – 20 कोटी रुपये
* उपविजेता – (सनराईजर्स हैदराबाद) – रु. 12.5 कोटी
* तिसरा संघ (राजस्थान रॉयल्स) – 7 कोटी रुपये
* चौथा संघ (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) – 6.5 कोटी रुपये

आयपीएल 2024 मध्ये ही बक्षिसेही मिळाली

* मोसमात सर्वाधिक विकेट्स (पर्पल कॅप) – हर्षल पटेल 24 विकेट्स (रु. 10 लाख)
* मोसमातील सर्वाधिक धावा (ऑरेंज कॅप) – विराट कोहली 741 धावा (रु. 10 लाख)
* हंगामातील उदयोन्मुख खेळाडू – नितीश कुमार रेड्डी (रु. 10 लाख)
* मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन – सुनील नरेन (रु. 10 लाख)
* सीझनचा इलेक्ट्रिक स्ट्रायकर: जेक फ्रेझर-मॅकगर्क (रु. 10 लाख)
* फँटसी खेळाडू ऑफ द सीझन- सुनील नरेन (रु. 10 लाख)
* सीझनचे सुपर सिक्स- अभिषेक शर्मा (रु. 10 लाख)
* कॅच ऑफ द सीझन- रमणदीप सिंग (10 लाख)
* फेअरप्ले पुरस्कार – सनरायझर्स हैदराबाद
* रूपे ऑन द गो-4s ऑफ द मैच: ट्रॅव्हिस हेड (रु. 10 लाख)
* पिच आणि ग्राउंड पुरस्कार: हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (50 लाख)

अंतिम सामन्यात मिळालेली पारितोषिके

* सामनातील इलेक्ट्रिक स्ट्रायकर: व्यंकटेश अय्यर
* सामनावीर: मिचेल स्टार्क
* सामन्यातील सुपर सिक्स: व्यंकटेश अय्यर
* रूपे ऑन द गो-4s ऑफ द मैच: रहमानउल्ला गुरबाज
* सामनातील ग्रीन डॉट बॉल: हर्षित राणा

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
IPL Trophy | आजारी आई म्हणाली आयपीएल ट्रॉफीशिवाय काहीही नको; केकेआरच्या मॅच विनरने सांगितला भावनिक किस्सा

IPL Trophy | आजारी आई म्हणाली आयपीएल ट्रॉफीशिवाय काहीही नको; केकेआरच्या मॅच विनरने सांगितला भावनिक किस्सा

Next Post
Shiva Rajabhishek Festival | अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या नूतन पदाधिका-यांची निवड

Shiva Rajabhishek Festival | अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या नूतन पदाधिका-यांची निवड

Related Posts
'तुम्हाला निवडून आणण्यासाठी तोंडातून रक्त गळत असतानाही प्रचारासाठी उभ्या राहिलेल्या बापाला इतकं दुःख देता'

‘तुम्हाला निवडून आणण्यासाठी तोंडातून रक्त गळत असतानाही प्रचारासाठी उभ्या राहिलेल्या बापाला इतकं दुःख देता’

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा होता. आज राष्ट्रवादीतील दोन्ही गटाचे मेळावे झाले…
Read More
नाना पटोले

ठाकरे गटाची ताकत वाढली; अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा पाठिंबा

मुंबई  – अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची…
Read More

ऑटो एक्सपोमध्ये सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक कार प्रदर्शित, जाणून घ्या काय आहे रेंज?

Auto Expo 2023 : ऑटो एक्सपो 2023 मध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्या त्यांची नवीन वाहने लाँच करत आहेत. मात्र, यावेळी ऑटो एक्स्पोमध्ये…
Read More