कोलकाता संघाचा कर्णधार ठरला ! ‘या’ खेळाडूवर पैशाचा पाऊस पडून घेतलं आपल्या ताफ्यात

मुंबई : आयपीएल २०२२ च्या लिलावात मोठी चुरस बघायला मिळत आहे. कोलकाता संघ यावर्षी एका कर्णधाराच्या शोधात होता. त्यामुळे भारताचा धमाकेदार फलंदाज श्रेयस अय्यर ला कोलकाता संघाने १२. २५ कोटी रूपरे देऊन संघात विकत घेतलं आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर च्या डोक्यावर पुन्हा एकदा कर्णधाराचा मुकुट सजणार आहे.

कोलकाता संघाने आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, वरून चक्रवर्ती, आणि सुनील नरेन यांना रिटेन केलं आहे. तर पंजाब संघाने शिखर धवननला ८.२५ कोटी रूपये देऊन संघात घेतलं आहे. तसेच वेगवान गोलंदाज किगीसो रबडाला ९.२५ रूपायाची बोली लावून पंजाब संघाने घेतलं आहे.

तसेच चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज फाफ ड्युफलेसिसला आरसीबीने ७ कोटी रुपये देऊन संघात घेतलं आहे. आँस्टेलिया चा धमाकेदार फलंदाज डेव्हिड वार्नरला दिल्ली कँपिटल्स संघाने आपल्या ताब्यात घेतले. डेव्हिड वार्नर या अगोदर हैदराबाद सनघाचा खेळाडू होता. तर वार्नर ने आयपीएलमध्ये दिल्लीकडून पण खेळला आहे.