IPL Playoff schedule 2024 | प्लेऑफचं वेळापत्रक निश्चित, पहिल्या क्वालिफायर आणि इलिमिनेटरमध्ये भिडणार ‘हे’ संघ

IPL Playoff schedule 2024 | आयपीएल 2024 च्या लीग टप्प्यातील सामने संपले आहेत. आता अंतिम लढत सुरू होईल. रविवारी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणारा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी एक गुण जमा झाला आहे. आता हैदराबादचे 18 तर राजस्थानचे 17 गुण आहेत. दोन्ही संघ गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. त्याचवेळी कोलकाता पहिल्या स्थानावर तर आरसीबी चौथ्या स्थानावर आहे.

पहिला क्वालिफायर कोलकाता-हैदराबाद यांच्यात होणार
कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 21 मे रोजी अहमदाबादमध्ये पहिला क्वालिफायर सामना खेळवला जाईल. दरम्यान, 22 मे रोजी एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. यानंतर क्वालिफायर-2 चेन्नईत 24 मे रोजी होणार आहे. क्वालिफायर-1 मध्ये पराभूत झालेला संघ आणि एलिमिनेटर जिंकणारा संघ यांच्यात हा सामना खेळला जाईल. 26 मे रोजी क्वालिफायर-1 आणि क्वालिफायर-2 मधील विजेत्या संघांमध्ये चेपॉक येथे अंतिम सामना खेळवला जाईल.

पाऊस राजस्थानचा खलनायक ठरला
आयपीएल 2024 मधील राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील शेवटचा लीग सामना रविवारी न खेळता रद्द करण्यात आला. या सामन्याची नाणेफेक 10:30 वाजता झाला जो केकेआरने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. यानंतर सामना रद्द करण्यात आला. याआधी दिवसाच्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जवर चार गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात पंजाबने 20 षटकात 5 गडी गमावून 214 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने 19.1 षटकांत 6 गडी गमावून 215 धावा केल्या आणि सामना जिंकला. यासह संघ 17 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी राजस्थानचे पहिले क्वालिफायर (IPL Playoff schedule 2024) खेळण्याचे स्वप्न भंगले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप