शाहरुखचा लाडका आर्यन खानचं पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत सुरू आहे अफेयर?

बॉलीवूड सिताऱ्यांच्या अफेयर्सच्या अफवा उडणे काही नवे नाही. एखादा अभिनेता एखाद्या अभिनेत्रीसह दिसला की, वाऱ्याच्या वेगाने त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि त्यांच्या अफेयर्सच्या चर्चा रंगू लागतात. काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान याचा मुलगा (Shahukh Khan Son) आर्यन खान (Aryan Khan) याचे नोरा फतेही हिच्यासोबत नाव जोडले जाऊ लागले होते. यानंतर आता आर्यन पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

पाकिस्तानी मॉडेल व अभिनेत्री सादिया खान (Pakistani Actress Sadia Khan) आणि आर्यन खान यांच्या रिलेशनशीपच्या अफवा रंगू लागल्या आहेत. नवीन वर्षाच्या दिवशी ते दुबईत एकत्र स्पॉट झाले आणि त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. यानंतर त्यांच्यात काहीतरी शिजत असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत. परिणामी सोशल मीडियावर आर्यन आणि सादिया खान (Aryan Khan Dating Pakistani Actress) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र आता खुद्द अभिनेत्री सादियाने ही अफवा आहे की सत्य?, याबाबत माहिती (Sadia Khan On Aryan Khan) दिली आहे.

दुबईमध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान सादिया आणि आर्यनची भेट झाली होती. यूएईच्या प्रकाशन सिटी टाईम्सनुसार, पाकिस्तानी अभिनेत्री म्हणाली, “संपूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय लोक माझ्या आणि आर्यनबद्दल असे कसे बोलत आहेत, हे खूप विचित्र आहे. नुसता एक फोटो पाहून लोक असे कसे म्हणू शकतात. अशा बातम्या पसरवायला काही मर्यादा असायला हव्यात.”

तिच्या आणि आर्यनच्या भेटीची माहिती देताना सादिया म्हणाली, “आम्ही नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला भेटलो होतो. फोटो क्लिक करण्यापूर्वी आमच्यात थोडेसे बोलणे झाले, बस्स. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही डेटिंग करत आहोत. आर्यनसोबत फोटो क्लिक केलेली मी एकटीच नव्हते. आर्यनसोबतचे फोटो क्लिक करून अपलोड करणारे बरेच लोक होते, पण फक्त माझेच फोटो का व्हायरल झाले, ते कळत नाही.”

डेटिंगच्या सर्व बातम्या अफवा असल्याचे सांगून सादियाने याला निराधार आणि मूर्खपणा म्हटले आहे. सादिया म्हणाली की, “आर्यन खूप गोड आणि खूप छान माणूस आहे. आर्यन चांगला वागणारा माणूस आहे, त्याच्याबद्दल अशा अफवा पसरवणे चुकीचे आहे.” सादिया तिच्या पाकिस्तानी शो खुदा आणि मोहब्बतसाठी ओळखली जाते.