शरद पवार दाऊदचा माणूस आहेत की काय? निलेश राणेंनी व्यक्त केली शंका 

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र भाजपनेते निलेश राणे यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. पत्रकार परिषदेत बोलत असताना निलेश राणे यांनी शरद पवार दाऊदचा माणूस आहेत की काय, अशी शंका उपस्थित केली आहे. दरम्यान, राणे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अनेक गंभीर आरोप असणाऱ्या नवाब मलिक (Nawab Malik) यांचा ईडीनं अटक केल्यानंतरही  महाविकास आघाडी सरकारनं राजीनामा घेतलेला नाही. त्यावर निलेश राणे यांना प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना निलेश राणेंनी हे विधान केलंय. याबाबत टीव्ही 9 मराठीनं ही बातमी प्रसिद्ध केलीय.

नवाब मलिक हे पवारांचे खास आहेत, असं राणे यांनी म्हटलंय. ‘अनिल देशमुख मराठा होते, त्यांचा घेतला राजीनामा. नवाब मलिकांसाठी वेगळा न्याय का? मला असा संशय येतो की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे, असा संशय मला येतो. ज्यानं दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल  देशमुखांचा पटकन राजीनामा घेतलात, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा?’ असा सवाल निलेश राणे यांनी विचारलाय.