अर्जुन खोतकर यांच्यामागे लावलेला कारवायांचा ससेमिरा हा केवळ राजकीय कारणांमुळे ?

अर्जुन खोतकर यांच्यामागे लावलेला कारवायांचा ससेमिरा हा केवळ राजकीय कारणांमुळे ?

जालना- शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यामागे लावलेला कारवायांचा ससेमिरा हा केवळ राजकीय हेतुपुरस्सर आहे. त्यामध्ये काही तथ्य नाही असा धीर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी अर्जुन खोतकर यांना दिला आहे.

गेल्या 15 दिवसांपासून अर्जुन खोतकर यांच्यावर विविध कारवायांचा भडिमार सुरू आहे, ईडीची चौकशी, भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा दौरा, या प्रकाराला घाबरून न जाता ज्या जनतेने आपल्याला सत्ता दिली आहे त्याचा उपयोग त्यांच्या विकासासाठी केला पाहिजे असा धीर देखील खासदार देसाई यांनी खोतकरांना दिला.

दरम्यान होत असलेल्या चौकशी आणि कारवाया या केवळ वेळेचा अपव्यय करणाऱ्या आहेत असे सांगून काँग्रेसशी आघाडी होऊ शकते का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की याविषयी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे, तसेच आघाडी सरकारचे चांगले चालू आहे .विरोधी पक्षाने आघाडी सरकार आता पडेल उद्या पडेल असे भाकीत केले होते मात्र आमच्या सरकारने दोन वर्ष सक्षम पणे पूर्ण केले आहेत आणि पुढील तीन वर्ष देखील ते पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे त्यावर असा बोलण्यात काही अर्थ नाही असेही ते म्हणाले.

शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी खासदार अनिल देसाई यांनी आज भेट दिली आणि धीर हि दिला. दरम्यान शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची देखील यावेळी मोठी गर्दी होती. यावेळी शिवसेनेची भूमिका खासदार देसाई यांनी स्पष्ट केली आणि कुठल्याही परिस्थितीत न डगमगता जनतेने आपल्याला ज्यासाठी निवडून दिले आहे ते कार्य करीत राहण्याची सूचनाही त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केल्या.

दरम्यान अर्जुन खोतकर यांनी बोलताना सांगितले की खासदार देसाई यांनी काही बंधने घातली आहेत आणि त्या पैकीच एक म्हणजे जाहीरपणे आत्ताच काही बोलायचे नाही, मात्र एवढे निश्चित आहे की, ज्याला कर नाही त्याला डर कशाला ही आपली भूमिका आहे आणि ती ठेवणार. असल्याचे ते म्हणाले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, ए. जे. बोराडे, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सविता किवंडे आदींची उपस्थिती होती.

Previous Post
kishor jogrevar

‘गोंड राजाने राज्य केलेल्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे’

Next Post
नांदेड ते जालना समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस प्रारंभ

नांदेड ते जालना समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस प्रारंभ

Related Posts

कर्नाटकाकडून मराठी बांधवांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे? – बाळासाहेब थोरात

मुंबई – सीमा भागात कर्नाटकातून मराठी बांधवांवर होत असलेले हल्ले अत्यंत गंभीर असून सीमा प्रश्नाने वेगळे वळण घेतले…
Read More
हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्यासाठी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना ट्रेनिंग दिल्याचा भाजपचा आरोप 

हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्यासाठी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना ट्रेनिंग दिल्याचा भाजपचा आरोप 

Ram Kulkarni | विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन हिंदु धर्माच्या देवाधिकांचा जाहिर अपमान करा ज्यामुळे मुस्लिम बांधवाची एकगठ्ठा मताची…
Read More
पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी सिंबबायोसिस आश्वासक पाऊल उचणार - डॉ. विद्या येरवडेकर

पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी सिंबबायोसिस आश्वासक पाऊल उचणार – डॉ. विद्या येरवडेकर

Symbiosis International University : हवामान, पर्यावरण याच्याशी संबंधित आपल्याकडे शास्त्रोक्त आणि कायद्याच्या परिभाषेतील अभ्यासक्रमाची कमतरता आहे. भविष्यामध्ये या…
Read More