‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे गळतात केस, टक्कल पडण्याआधी माहिती करुन घ्या उपाय

जर तुमचे केस वेगाने गळत असतील तर याचे कारण तुमचा आहार आणि जीवनशैली नसून आणखी काही असू शकते. होय, तुम्हाला याचे आश्चर्य वाटेल, परंतु हे शरीरातील व्हिटॅमिन बी12 च्या (Vitamin B12) कमतरतेशी संबंधित असू शकते. वास्तविक, व्हिटॅमिन बी12 तुमच्या केसांमधील ऑक्सिजन आणि रक्ताभिसरणाशी निगडीत आहे. त्याच्या कमतरतेमुळे तुमच्या केसांमध्ये पोषणाची कमतरता निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत, आपण या व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता टाळली पाहिजे. पण, त्याआधी जाणून घ्या, व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे केस का गळतात?

व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे तुमचे केस का गळतात? Can lack of B12 cause hair loss?
व्हिटॅमिन बी12 लाल रक्तपेशी तयार करण्यात मदत करते जे तुमच्या डोक्यासह संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असते, तेव्हा तुमच्या टाळूमध्ये ऑक्सिजनची कमतरता असते. यामुळे तुमचे केस गळतातच पण तुम्ही टक्कल पडण्याचाही बळी होऊ शकता.

केसांसाठी व्हिटॅमिन बी-12 का आवश्यक आहे – B12 Benefits for Hair
व्हिटॅमिन बी12 हे केसांच्या कूपांचे पोषण करणारे आणि निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देणारे एक जीवनसत्व आहे. तसेच, ते टाळूला आतून निरोगी बनवते आणि तुमचे केस मजबूत आणि कंडिशन करण्यास मदत करते. यामुळे तुमचे केस लांब, दाट आणि मजबूत होतात.

व्हिटॅमिन B-12 च्या कमतरतेमध्ये हे पदार्थ खा – Vitamin B12 Foods
व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमध्ये या पदार्थांचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जसे की मांस, मासे, दूध, चीज, अंडी आणि काही हिरव्या भाज्या. त्यामुळे केस निरोगी ठेवण्यासाठी हे पदार्थ खा.

(टीप- हा लेख सामान्य माहितीसाठी आहे. याचा अवलंब करण्यापूर्वी वैद्यकिय तज्ञांचा सल्ला घ्यावा. आझाद मराठी याची पुष्टी करत नाही)