राजकारणासाठी वातावरण दुषित केलं जातं आहे हे चांगलं नाही – शरद पवार 

पुणे –  आपला देश अनेक जाती धर्मांनी बनला आहे. यामध्ये विविधता आहे. ती उठून दिसली पाहिजे. या देशात जी फुलं उमलली आहेत त्यांचा सन्मान करायला हवा. आज जगात चमत्कारी स्थिती निर्माण झाली आहे. रशिया छोट्याश्या युक्रेनवर हल्ला करतो (Russia invades small Ukraine) आहे. हजारो लोकं मारली जात आहेत. मानवतेचं दर्शन संपल्याचं दिसतं आहे. आपल्या शेजारच्या श्रीलंकेत (Sri Lanka) सामान्य नागरिक रस्त्यावर उतरला आहे. संघर्ष सुरू आहे आणि राज्यकर्ते भूमिगत झाले आहेत. पाकिस्तानात (Pakistan) पंतप्रधानाला पद सोडावं लागलं. हे का घडतंय ? कारण त्या ठिकाणचे राज्यकर्ते आणि त्यांनी घेतलेल्या भूमिका यामुळे होतंय. असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यात बोलताना म्हटले आहे.

पुढे शरद पवार म्हणाले की, आज देशाच्या अभिमानाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पिढ्यानपिढ्या एकत्र राहणाऱ्यांना तोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे, आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन त्यांच्या विरोधात उभं रहावं लागेल. यांना धडा शिकवावा लागेल. आज आपण इथे जमलो आहोत कारण आपण जात धर्म बाजूला ठेवायचा आहे. आपल्याला माणुसकी जपायची आहे.

महागाई, विकासाचे प्रश्न (Inflation, development issues) उभे आहेत. मात्र देशात जे चित्र उभं झालंय त्या अनुषंगाने आपल्याला सध्या भाईचारा जपणं आवश्यक आहे. आजच्या घडीला चुकीचे विचार पसरवले जात आहेत. राजकारणासाठी वातावरण दुषित (Polluted environment for politics) केलं जातं आहे हे चांगलं नाही. त्याविरोधात उभं राहिलं पाहिजे असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.