नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. त्यात नुकतीच त्यांनी तीन कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केली तसेच देशाची माफीही मागीतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश पर्व सोहळ्याचं निमित्त साधून देशाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देताना तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘शेती कायदे शेतकऱ्यांना समजवून सांगण्यात आम्ही कमी पडलो असं पंतप्रधान म्हणतात. वास्तविक, शेतकऱ्यांना हे कायदे पूर्ण समजले म्हणूनच इतकं मोठं आंदोलन झालं. शेतकरी एकजुटीचा विजय असो !!!’ अस जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
शेती कायदे शेतकऱ्यांना समजवून सांगण्यात आम्ही कमी पडलो असं पंतप्रधान म्हणतात.
वास्तविक, शेतकऱ्यांना हे कायदे पूर्ण समजले म्हणूनच इतकं मोठं आंदोलन झालं.
शेतकरी एकजुटीचा विजय असो !!!!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 19, 2021
आमचं सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी पावलं उचलत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक सुधारावी आणि त्यांची सामजिक स्थिती चांगली व्हावी म्हणून इमानदारीने काम करत आहोत. आम्ही त्यासाठी तीन कृषी कायदे आणले होते. देशातील छोट्या शेतकऱ्यांना बळ मिळावं. त्यांना पिकांना योग्य दाम मिळावा आणि उत्पादन विक्रीसाठी बाजार मिळावा हा त्यामागचा हेतू होता. ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती. अनेक सरकारांनी यापूर्वी त्यावर मंथन केलं होतं. यावेळीही संसदेत चर्चा झाली आणि कायदा आणला. देशातील कोट्यावधी शेतकरी आणि संघटनांनी त्याचं स्वागत केलं. मी त्यांचा आभारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.
https://youtu.be/3AmlxDP4tcU