दुसरा गाल पुढे करायला हिंमत लागते, आरोप करणारे भित्रट”; तुषार गांधींनी कंगनाला सुनावले

दिल्ली : बॉलिवूड क्वीन कंगना रणौत हिने महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भात केलेल्या विधानांवरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. कंगनाविरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात असून, विविध स्तरातून तिच्यावर टीका केली जात आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनिता बोस यांनी कंगनाला फटकारल्यानंतर आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी कंगनाला सुनावले आहे.

ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना सत्तेच्या भुकेल्या आणि धूर्त लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले होते. हे तेच लोक होते ज्यांनी त्यांचे शोषण केले. यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती किंवा त्यांचे रक्तही उसळले नाही. हेच लोक आम्हाला शिकवतात, जर तुम्हाला कोणी थप्पड मारली तर दुसर्‍या गालावर दुसरी थप्पड खा आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. पण कोणालाही असे स्वातंत्र्य मिळत नाही. अशा प्रकारे फक्त भीक मिळते. म्हणून आपले आदर्श हुशारीने निवडा, असे कंगनाने म्हटले होते. यानंतर तुषार गांधी यांनी एका लेखाच्या माध्यमातून कंगनावर पलटवार केला आहे.

दुसरा गाल पुढे करण्यासाठी गांधींचा द्वेष करणारे समजू शकतील त्यापेक्षा जास्त हिंमत लागते. गांधीवादी फक्त दुसरा गाल पुढे करतात, असा आरोप करणारे भित्रट असून यासाठी लागणारे धाडस ते समजू शकत नाहीत. हे धैर्य समजून घेण्यास ते असमर्थ आहेत. पण आपण विसरता कामा नये. दुसरा गाल पुढे करणे हे भीतीचे लक्षण नाही. यासाठी खूप धाडस लागते आणि हे त्यावेळीच्या भारतीयांनी मोठ्या प्रमाणात दाखवून दिले होते. ते सर्वजण हिरो होते, तर भित्रट लोक आपल्या डोळ्यांची पापणीही न हालवता वैयक्तिक फायद्यासाठी दयेसाठी याचना करत होते, असे तुषार गांधी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कंगना रणौतने इंस्टाग्राम स्टोरीजवर दोन मोठे संदेश पोस्ट करत आपल्या आधीच्या विधानाबाबत भूमिका मांडली. गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना समर्थन दिले नाही. भगतसिंगच्या फाशीला गांधींचा पाठिंबा होता, असे बरेच पुरावे आहेत. यामुळे कोणाचे समर्थन करावे हे तुम्ही ठरवले पाहिजे. कारण या सर्व गोष्टी मनात ठेवून त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणे पुरेसे नाही. खरे तर हे मौन अतिशय बेजबाबदार आणि वरवरचे आहे. प्रत्येकाला त्यांचा इतिहास आणि आदर्शाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे, असे म्हटले होते.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

Previous Post

अब तक 56 चित्रपटात धमाकेदार भूमिकेत दिसला होता बाबासाहेब पुरंदरे यांचा मुलगा;

Next Post

’पांडू’ने दिल्या ‘झिम्मा’ला शुभेच्छा

Related Posts

Film review : ‘डॉक्टर-जी’ स्त्री रोग तज्ञ असणाऱ्या पुरुष डॉक्टरची कथा आणि व्यथा

Prafulla Patil :  आपल्याकडे अजूनही म्हणजे एकविसाव्या शतकात महिलांना पुरुष डॉक्टरसमोर बऱ्याच पर्सनल गोष्टी बोलायला संकोच वाटतो. तर…
Read More
मविआ सरकार पाडण्यात अदानीची भूमिका; अजित पवारांच्या खुलास्यानंतर काँग्रेसचा हल्लाबोल

मविआ सरकार पाडण्यात अदानीची भूमिका; अजित पवारांच्या खुलास्यानंतर काँग्रेसचा हल्लाबोल

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठे विधान केले…
Read More
shinde - desai

मंदिराच्या जागेसाठी लढा उभारण्याची भाषा करणारे, महिलांना मंदिरात प्रवेश देण्याच्या आंदोलनावेळी कुठे लपुन बसले होते ?

Pune – देशात सध्या ज्ञानव्यापी मशीदीचा (Gyanvapi Mosque) मुद्दा चांगलाच पेटला असताना आता पुण्यातही पुण्येश्‍वर (Punyeshwar) आणि नारायणेश्‍वर…
Read More