संजय राऊत यांनीच शरद पवारांच्या घरावर हल्ला घडवून आणल्याचा ‘या’ नेत्याने केला संशय व्यक्त

मुंबई – जेष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनचे कालपासून राजकीय पडसाद पडत आहेत. अनेकांनी गृह विभागावर टीका केली असून विरोधकांसह सत्ताधारी सुद्धा पोलीस प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला करण्यामागे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा हात असल्याचा संशय भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी व्यक्त केला आहे.

सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना प्रवीण दरेकर यांनी हा संशय व्यक्त केला. संजय राऊत हे भ्रमिष्ट झालेले नेते आहेत. त्यांच्या सर्व विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार राऊत यांनी केला असावा असं म्हटलं आहे. काही दिवसांपासून संजय राऊत हे वैफल्यग्रस्त झाले आहे. वारंवार त्यांच्या भूमिका बदलत आहे. त्यांची विधान येत आहे. मला तर संशय येतोय की संजय राऊत यांनी काही नियोजन पद्धतीने कार्यक्रम केला की काय अशी शंका आहे.असं ते म्हणाले.

संजय राऊत यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावरील हल्ल्या मागे हात असावा, अशा प्रकार शंका घ्यायला त्यांची वाव आहे, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे’ असा दावाच दरेकर यांनी केलं आहे. पोलिसांच्या गुप्त विभागाचे हे अपयश आहे. जी लोक आपल्या नेत्यांची संरक्षण करू शकत नाही, आपल्या नेत्यांची काळजी घेऊ शकत नाही. त्यांनी राज्याच्या हिताची गोष्टी करू नये, या प्रकरणाच्या खोलात जाण्याची गरज आहे, असंही दरेकर म्हणाले.News 18 लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.