‘परीक्षा पे चर्चा’ करताय ठिक आहे परंतु ‘परेशानी पे चर्चा’ कधी करणार आहात – राष्ट्रवादी

मुंबई – मोदीजी ‘परीक्षा पे चर्चा’ (pariksha pe charcha) करत आहेत ठिक आहे परंतु ते ‘परेशानी पे चर्चा’ कधी करणार आहेत याबाबत नामवंत सेलिब्रिटी त्यांना कधी विचारणार आहेत असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो (Clyde Krasto) यांनी सेलिब्रिटीना ट्वीट करून केला आहे.

१ एप्रिलला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) हे परीक्षेला बसणाऱ्या मुलांशी संवाद साधणार आहेत. त्यावर देशातील नामवंत सेलिब्रिटी हा संवाद बघण्यासाठी जनतेला आवाहन करत आहेत त्यावर क्लाईड क्रास्टो यांनी जोरदार टिका केली आहे. देशभरातील जनता अनेक सोयी सुविधांनी, समस्यांनी त्रस्त आहे त्यांच्याशी पंतप्रधान कधी संवाद साधणार आहेत… समस्यांवर कधी बोलणार आहेत हेही त्यांना विचारा असा टोलाही क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीटच्या माध्यमातून लगावला आहे.

परीक्षा कालावधीत मुलं अभ्यासाच्या तणावाखाली असतात त्यांच्याशी संवाद साधून पंतप्रधान त्यांना तणावमुक्त करत आहेत, त्याबद्दल त्यांचे आभार, मात्र देशात दिवसागणिक पेट्रोल – डिझेलचे दर, गॅस सिलेंडरचे दर वाढत आहेत, महागाईने डोके वर काढले आहे, त्या चिंतेत असलेल्या पालकांच्या, लोकांच्या परेशानीचाही सेलिब्रिटीनी कधी विचार केलाय का ? त्या परेशानी दूर करण्यासाठी कधी असे आवाहन ट्वीट करुन केले आहे का? असा थेट सवाल क्लाईड क्रास्टो यांनी केला आहे.