Jay Malokar | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर काल अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात अमोल मिटकरींना काही झाले नाही, मात्र त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. त्यांच्या गाडीच्या काचा मनसे सैनिकांनी फोडल्या आहेत. या राड्यानंतर हल्ल्यात सहभाागी असलेले मनसे कार्यकर्ते जय मालोकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे हे प्रकरण जास्तच तापले आहे. दरम्यान, आता या मृत्यू प्रकरणी जय मालोकार (Jay Malokar) यांच्या नातेवाईकांनी चौकशी करुन कारवाईची मागणी केली.
या बाबत जय मालोकर यांच्या नातेवाईकांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांचे नातेवाईक डॉ. किशोर मालोकर टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, जय याला त्यावेळी लोटालाटी झाली, त्याच्यावर प्रेशर आणले. अमोल काळे नावाच्या व्यक्तिने त्याच्यावर जास्त प्रेशर आणले. त्या घटनेची चौकशी करुन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. यासाठी आता आम्ही पोलिसात तक्रार करणार आहे, असंही किशोर मालोकर म्हणाले.
पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून कारवाई केली पाहिजे. त्यावेळी मालोकार याच्यासोबत झटापट झाली, यावेळी तिथे असणाऱ्या सर्वांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही डॉ.किशोर मालोकार यांनी केली.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप